एक वळण येतं असं बहुधा प्रत्येक नात्यात
जिथे कस लागतो माणसांचा
वळणाच्या पुढे काय खाचखळगे की सरळ रस्ता
की वाटा काट्याकुट्याच्या??
कदाचित येईल दुथडी नदी,आकंठ तृप्ती लेऊन
कदाचिते येईल सुंदर बाग फुलापानांनी न्हाऊन!!
कदाचित येईल निळा समुद्र किनारा सोबत घेऊन
कदाचित येईल ज्वाळा विखारी ठिणगी ठिणगी बनून?
या वाटेवर हात सोडता काय होईल त्या बंधाचे?आतुरलेल्या क्षणांचे,मुसमुसणार्या नयनांचे??
आर्या