***** अ र्प ण *****
– कृष्णदास ( मच्छिंद्र माळी)
औरंगाबाद .
भाव धरोनी मनी भजा राम राया ||
देवा तुझीया पायी अर्पण ही काया||धृ||
कोटी कोटी फेरे तेव्हा मिळेही काया||
चंगी , भंगी व्यसनी घालावी न वाया||
भक्ती मार्ग धरी, नको पातकाची छाया||१||
ज्ञाना तुका नामा जना संत हे महान||
भक्ती वैराग्याविना क्षेत्र हे सहान ||
श्रध्दा , ज्ञान होता सरण ही माया ||२||
‘रामकृष्ण हरी’ मंत्र असे हा सोपा||
क्षणोक्षणी मनोमनी सदा हा जपा||
कृष्णदासे दावी मार्गा लागूनी पाया ||३||
रामराया पायी अर्पण ही काया ||
*** *** ***