Marathi Quote in Poem by Vinod

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

वेडी माया!

मुलगी सासरला जायला निघते,
आईला म्हणते, बाबा नाही आले अजून शेतातून,
अगं येतील तू कर तयारी,
तो बघ रिक्षा आला,
कुणी पाठविला, कळलेच नाही!

स्टेशनवर आल्यावर रिक्षावाला म्हणतो,
तुम्ही जावई माणसं, कसे घ्यावे पैसे,
गाडी सुटायची वेळ झाली,
तेवढ्यात बाबा दिसले,
तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे!

काय म्हणावे या मायेला,
बाप लेकीचे नातंच तसे वेगळे,
नुसत्या भेटीतही आनंद किती वेगळा,
दोघेही बोलले नाही,
फक्त डोळ्यांनीच भावना व्यक्त झाल्या!

एक दिवस माझे लक्ष गेले,
दरवाज्यापर्यंत यायची, वाट पहायची,
संध्याकाळी म्हटले काय झाले,
डोळ्यात पाणी आले,
काही नाही तिखटाचे हात होते म्हणून!

रात्री मात्र चंद्रालाच मानले भाऊ,
ओवाळणी घातली भाऊ मानून,
चंद्रही हसला, पण क्षण मात्र वेदनेचा,
भावाला मात्र नाही कळली ही माया,
वेडी बहीण वाट पाहत राहिली भावाच्या वाटेची!

मग रात्री म्हणाली, हा शर्ट कसा दिसतो,
सांगा बरं घालून, मला बघून हसली,
छान दिसतो, शोभून,
वेड्या बहिणीची ही वेडी माया,
नाही कळली भावाला!

मग हसली, म्हणाली,
वेळ नसेल मिळाला भावाला,
संसाराचा गाडा मोठा असतो नां,
मीच वेडी बाई,
उगीचच वाट पाहत बसले!

शेवटी एकच म्हणावेसे वाटते -
नाती जपताना शब्दांची गरज नसते,
कधी डोळ्यांतील पाणीच,
मनातील माया सांगून जाते!

दि. 11 नोव्हें., 2026.
प्रा. डॉ. विनोद राऊत,
से. नि. प्राध्यापक,
अमरावती.

Marathi Poem by Vinod : 112040905

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now