कविता
“नाते
तुझे माझे नाते जणु गवताचे पाते
हिरवे हिरवे गार ..
आणी” स्वच्छंदी” फार .!!
तुझे माझे नाते
जणु फुलांचा दरवळ
पसरतो परिमळ चोहीकडे !!
तुझे माझे नाते
कुणा कशाला सांगावे
मनी आपल्याच त्याला अभिमाने मिरवावे
तुझे माझे नाते
फक्त तुझ्या माझ्या साठी
कशाला सांगाव्या जनामध्ये त्यांच्या “गोष्टी “
...........वृषाली ..