रविवार ..
❤रविवार चा छान दिवस ...
सकाळी नेहेमी प्रमाणे फिरून आल्यावर आपले बागेत मस्त कॉफी पान होते
तो पर्यत अनेक रविवार चे पेपर आणि आणि पुरवण्या येवून पडल्या असतात
ते वाचायची खुप उत्सुकता असते
पण पोटात कावळे ओरडत असतात आत्ता पर्यत ..
मग अंघोळ आटोपून मस्त #differernt असा नाश्ता केला जातो
नाष्टा कोणी बनवावा हा आपल्या कडे कधीच प्रश्न नसतो ..
तु जे पदार्थ करतोस ते फक्त तुच छान करतोस असे माझे #पक्के #मत असते
आणि मी जे जे काही करते ती फक्त माझीच स्पेशालीटी असते असा तुझा #विश्वास असतो
त्या त्या राविवारी जी ज्याची इच्छा असेल ते केले जाते
मस्त नाश्ता झाला की आपण दोघे आपल्या हॉल मध्ये पेपर वाचायला बसतो .
(तसेही आपण कधीच वेगवेगळ्या खोल्यात बसत नसतो )
हॉल मध्ये पाण्यात ठेवलेल्या मस्त ताज्या फुलांचा वास असतो ..
त्यातच माझ्या नुकत्याच शाम्पू केलेल्या #केसांचा #मंद #वास रेंगाळत असतो
(जो तुला खुप आवडतो )
स्वयपाक घरातून नुकत्याच केलेया पदार्थांचा वास ..
शिवाय अंघोळी नंतर देवा पुढे हात जोडताना लावलेल्या उदबत्तीचा पण वास असतो
असे सुगंधी वातावरण ..
मग मी एका बशीतून भाजके शेंगदाणे किंवा तत्सम काही आणून आपल्या दोघा मध्ये ठेवते
( हो ..किती पोटभर खाल्ले तरी मला चटक मटक लागतेच )
रेडीओ वर #छान #जुनी गाणी लागलेली असतात ..
अशा मस्त वातावरणात आपले वाचन चालु असते
तसे आपले दोघांचे वाचनाचे विषय थोडे वेगवेगळे
मी “ललित “ साहित्यिक “गाणी कविता “याची आवड ठेवणारी ..
तुला राजकारण इतर माहिती पूर्ण गोष्टी ..क्रिकेट यामध्ये रुची
त्या त्या आपल्या आपल्या पेपर च्या पुरवण्या आपण घेतो
माझे वाचन थोडे वर #वरवर चे ..
तुझे प्रत्येक वाचन #सखोल आणि शब्द आणि शब्द असे ....
मग मध्येच मी माझ्या वाचना मधील तुला काही कवितेच्या ओळी अथवा इतर
काहीतरी वाचून दाखवते आणि तुझे चित्त माझ्या कडे ओढून घेते ..!!!
तु पण मध्येच काही माहिती पूर्ण असे मला” ऐक जरा ...”असे बोलून ऐकवत असतो
आणि मग मी पण अरेच्या हे कसे आपल्या वाचनात आले नाही असे तुला बोलून दाखवते
असे छान दोन तीन तास आपण सगळ्या जागा पासून दूर ...असतो
आजूबाजूला संगीत वाजत च असते
आपल्या दोघांच्या त्या मैफलीत सर्वच असते
सूर ..सुवास ..माहिती ..गाणी ...
तो समा ..अगदी” #मस्तीभरा “असतो ..
असे अनेक रविवार आपण एन्जोय केले आहेत ..
आणि अजून #खुप एन्जोय करणार आहोत ....❤❤❤