...बँक डायरी ..!!!
बँकेत काम करीत असताना नेहेमीच वेगवेगळ्या प्रकारची माणसे आम्हाला भेटत असतात
असेच कधी मधी दिसणारे एक व्यक्तिमत्व ..!
धारदार नाक, चेहेरेपट्टी अगदी शिवाजी राजासारखी ..!
चेहेर्यावर हलकासा मेक अप चा थर ..!
डोळ्यात कडे पर्यंत ..ओढलेली काजळाची बारीक धार ..!
कपाळावर दुबोटी गंध मध्ये ओम ..!
केस मानेपर्यंत पोचलेले ..आणी पूर्ण मागे वळवलेले ..!
कानावर पण बारीक रेखीव कल्ले..काढलेले ..!
कानात मधोमध मोठा मोती असलेली भिकबाळी ..
फक्त अंगात कपडे आताच्या “ आम आदमी “.सारखे ..
असे वाटत होते आपण एखाद्या ..राजाला पाहत आहोत की काय ??
आज अचानक माझ्यासमोर त्यांचे आगमन झाले ..पैसे भरण्यासाठी ..
एक कटाक्ष टाकून....त्यांचे कडे पाहून ..मी हसले ..
आणी म्हणाले ..एखाद्या जुन्या राजा सारखे दिसता तुम्ही ..
मी नेहेमी ..पाहते तुम्हाला ..
असा गेट अप रोज करण्याचा कंटाळा येत नाही तुम्हाला ??
ते पण हसले ..आणी म्हणाले,” मी रोजच असा राहतो ...
मला अगदी कौतुक वाटले ..
कित्येक वर्षे जुन्या पठडीतला ..एकच बेअरिंग चा मेकअप न कंटाळता करणे
आणी त्याच भूमिकेत वावरणे ...सोपे नाही ..!
मग त्याच उत्सुकतेने मी विचारले ..
“काय करता तुम्ही व्यवसाय ??
आपला दारूचा गुत्ता आहे जवळच मेडेम...
उत्तर ऐकून ..मी मात्र “अवाक “....