प्रवास एका कुटुंबातील मुलीचा ✨
जन्माला आलीस तु,
आमच्या जीवाचे सार्थक झाले.
मिळाली आधाराची काठी,
आता अजून दुसरे काही नाको जाहले...
बाबांची गोड प्रेमाची बाहुली तू
आईची सुखाची सावली तू....
चिमुकल्या पावलांनी नांदवितेस
बहरतीचा श्रावण तू...
वाढवली तिला संस्काराच्या वडाखाली,
बनवली तिला आत्मनिर्भर..
आपल्या जवळच ठेवावे वाटते तिला..
अशी झाली आई बाबांची गत
पण ह्या जगातील नियम हे फार काळ टिकू देईना,
बांधले तुझे बंध दुसऱ्या घरा.
" ए बाळा, सांग बरं कोणाकडे आम्ही बघू, आणि सुखाने हसू "
म्हणे तिचे आई बाबा 💔
मुलगी गेली सासरी,
नांदू लागली सुखानी
आशीर्वाद मिळाला मुलीच्या रूपाणी.
पण विचार आला,हे चक्र पुन्हा सुरु होईल का?
हेच आहे का मुलीचे जगणे?
विचार नाही केला जास्त.
आपल्या लक्ष्मीमिचे केले स्वागत.
वाढवली तिला संस्काराच्या वडाखाली.
बनवली तिला आत्मनिर्भर...
पण प्रश्न उरतो हा
कि एवढेच का मुलीचे जगणे?
ह्याचे उत्तर कदाचित असेल
माणसं-माणसांनी वेगळे
पण एवढे कळून चुकले
बनवा तिला स्वावलंबी
देऊ नका कोणास अधिकार
तिच्या अस्तित्वाची नासधूस करण्याची संधी
~लेखणी ✨