जिद्दीची वाट
ध्येयासाठी चालत राहा,
अडचणींना टाळत राहा.
पडला जरी वाटेमध्ये,
पुन्हा नव्याने उभा राहा.
काळोख कितीही दाटला,
आशेचा दीप मात्र पेटवा.
मेहनतीचे बीज पेरा,
यशाचे सुंदर फूल घ्या.
स्वप्नांना दे पंख नवे,
आकाशाला स्पर्श करा.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास,
यांच्या बळावर पुढे चला.
हार कधीच मानू नका,
ध्येयापासून दूर जाऊ नका.
कारण शेवटी जिंकतो तोच,
जो संकटांशी लढत राहतोच.
— मिनाक्षी शरद रामटेके