कविता
पाऊस..
राना वनातुन दर्या खोर्यातून बागडत निघालेला पाउस
खेड्या पाड्यात पोचला
त्याची चातकासारखी वाट पाहणारा शेतकरी सुखावला
इवली रोपे ,मोठी मोठी झाडे ,प्राणी पशु पक्षी
सार्याना प्रफुल्लीत करीत पाउस पुढे निघाला
सर्व प्राणीमात्रांचा आनंद पाहून पाउस खूष होऊन गेला !!
मग शिळ घालीत जोमात तो शहराच्या दिशेने निघाला
पाउस शहरात पोचला तेव्हा शहरात एकच “दंगल “उसळली होती
घरे ,दुकाने बंद करून भयभीत लोक घरात बसले होते ..
रस्त्यारस्त्यावर काचा .दगड यांचा “सडा “पडला होता
संतप्त जमाव झुंडी झुंडी ने वाहने ,दुकाने याची फोडाफोड करीत होता
पाउस एकदम” बावचळून” गेला !!
इकडे तिकडे थोडा कानोसा घेतला तेव्हा समजले त्याला
दंगली चे कारण काहीही असले ..
तरी ती आता “जातीय दंगल “बनली होती !
अचानक भगवे झेंडे घेतलेला एक हिंदू लोकांचा घोळका
पावसाच्या समोर ठाकला ..
पावसाला त्यांनी “मुसलमान “समजून चांगले झोडपून काढले
जखमां अंगावर वागवत पाउस पुढे निघाला
आणि मुसलमान लोकांच्या “तावडीत “सापडला
पावसाला वाटले आता आपल्याला “नागवा “करतात की कांय
त्यांची नजर चुकवून पाउस तेथून सटकला
कसाबसा पाउस शहरातून बाहेर पडला
पाउस कधीच नव्हता “हिंदू “किंवा “मुस्लीम “!!
तो तर फक्त ..
प्रेमी जणांच्या प्रणयात डोकावणार होता
त्यांच्या भावनांना “उधाण “देणार होता ..
त्यांच्या “रोमांटिक”आठवणी जागवणार होता
अनुभवायचा होता त्याला प्रीतीचा “थरार “!
पहायची होती त्याला प्रियकराच्या डोळ्यातील “ओढ “
आणि प्रियतमेच्या गालावरली लज्जेची “लाली “!
खूप नाराज होवून पाउस स्वताशीच म्हणाला
आता पुढील वर्षी येताना “विचार “करायला हवा !!!!
वृषाली गोटखिंडीकर