आत्मविश्वास
उंच आकाशी घ्यायची आहे झेप सांग काय करू मी उंच आकाशी जाऊनी पंख पसरायचे आहेत काय करू मी..........
आत्मविश्वासाचा प्रत्येक तुकडा घे सारे ओडुनी निळ्या आकाशी झेप घे भय सारे सोडूनी
जशी आकाशी घेशील झेप आस्वाद होईल निरनिराळ्या रंगांनी आत्मविश्वास वाढेल तुझा तुझ्याच पंखांनी
मिळतील नवे सवंगडी नेहतील वेगवेगळ्या दिशेनी तरीही विसरू नकोस तूझ्या घरट्याला कारण जगायला शिकवले तूला तुझ्याच घरट्यानी