Marathi Quote in Poem by vrunda

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

जपले नाते...🌿


🌿🌿🌿🌿🌿🌿


कधी कधी पानं चाळली जातात,
काही कळत नसताना...
कधी कधी पानं गाळली जातात
नुसतं पळत असताना...

पुस्तके कधी हसवणारी,
कधी सागराप्रमाणे उसळणारी...
पुस्तके कधी रडवणारी ,
कधी झरयाप्रमाणे खळखळणारी...

पुस्तके कधी भांडतात,
तर कधी कुजबुजतात...
भावनेच्या आहारी पाठवुन ,
आपल्याला निशब्द करतात...

रागवत नाहीत रुसत नाहीत,
पुस्तके काहीतरी देऊन जातात...
नाहीच देता आलं तर काही,
पानाचा नंबर ठेऊन जातात...

प्रत्येक पुस्तक प्रत्येक वाक्य,
अर्थ नवे नवे सांगतात...
न कळलेले शब्द तेंव्हा,
जिभेवरती रेंगाळतात...

पुस्तके सुद्धा घाबरी होतात,
आपल्यासोबत असताना...
अलगद त्यांना जवळ घ्यावे,
मग प्रत्येक पान उलगडताना...

कधी शब्द वेचून वेचून,
विचारांची रिकामी झोळी भरावी...
उगाच कधी त्या पुस्तकाची
पानं नुसती ओली करावी...

पुस्तकांच्या वाटेवर,
नेहमी फेरफटका मारावा...
पुस्तकांची संगत असते तेव्हा,
सलत नाही कसला दुरावा...

जिवापाड जपले नाते,
पुस्तकात मी रमून राहे...
प्रत्येक पुस्तक आवड माझी,
भोवती त्यांचेच कोंदण आहे...


🌿🌿🌿🌿🌿🌿

Marathi Poem by vrunda : 112017004
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now