बस यात्रा
रोजच्या बसचा एक उत्साही कंडक्टर
खुप दिवसांनी बसमध्ये ड्युटी वर दिसला
नमस्ते मॅडम
आवाज इतका मोठा की सगळ्या बस मध्ये ऐकु जाईल!
नमस्कार.काय म्हणता
काय नाश्ता करून येता की नाही सकाळी ?
हो तर पोळी भाजी भात खाऊन येते ना
डबा नाही आणत ?
आणते की डबा दुपारी खाते
पण नुसते खुर्चीत बसुन भुक कशी लागते तुम्हाला ?
त्याचा भाबडा प्रश्न..
का नाही लागणार?
डोक्याच काम असतच की
.शिवाय बोलायला लागते की दिवस भर.
हो त्ये बी बरोबरच.
डबा आणताl की नाही भरपुर ?
त्याची प्रेमळ चौकशी.
एक पोळी भाजी आणि सलाद आणतेतेवढे पुरते मला.
भात आमटी नाही डब्यात ?
त्याचा आश्चर्य युक्त प्रश्न.
आता सगळीच बस आमच्या बोलण्या कडे कान लावते
डब्यात नाही आणत भात सकाळी खाऊन येते ना...
हेच चुकत तुमच्या साहेब लोकांचे नीट
जेवत नाही आणि आजारी पड़ता
आता सगळीच बस किव केल्या सारखी माझ्या कडे पाहु लागते
जणु काय मी सारखी आजारी असते
मी शांत.ओठावर एक सौम्य हसु
#बँक _डायरी
हरपाल ..
एक चहा बँकेत पोचवणारा मुलगा ..
रोज दोन तीनदा तरी भेट ..
गप्पा चेष्टा मस्करी रोजच असते
कीती तरी वर्षे या लहान गावात मध्य प्रदेशातून आलेल्या
लोकांची पिढी वाढत आहे
एक आला की बरोबर नातेवाईक पण असतातच
त्यांच्या गावी काहीच पोट भरण्याचे साधन नसल्याने
महाराष्ट्र त्यांचे साठी सर्वोत्तम आहे
आता तो जिथे काम करतो ते हॉटेल बंद होणार काही दिवसात
मालकाचा तिथला करार संपला आहे
फिर क्या करोगे हरपाल .,.
माझा प्रश्न ,.
कुछ् नही गाव चला जावूंगा ..
वहाँ खेती है हमारी खेती करेंगे और क्या
(त्या खेतीत काहीच उगवत नाही हे मला पण माहीत आहे आणी त्याला पण )
जाते वक्त सारा पगार लेके जायेंगे ,
म्हणजे ..आता पगार घेत नाहीस का तु ..
नही पगार तो मालिक के पास रेहेती है
मेरा रेहेन सेहेन खाना पिना कपडे रेहेना सब तो मालिक ही खर्च करता है
फिर मुझे काहे चाहिये पगार वगार ..?
अरे वा फिर तो अच्छा है ..
हा और अगर छुट्टी के दिन धाबे पर भी खाना खाओ
तो भी बिल मालिक ही भरता है ..
ये बात है तो फिर क्यो छोड जाते हो ये गाव
माझा ,..प्रश्न ..
कही दुसरे होटल मे काम धुंडो ना हरपाल ..
अरे म्याडम काम तो कही भी मिल सकता है .,
मगर ऐसा "मालिक "नही मिलेगा ना ,,
मी मनोमन त्या "मालकाला "वंदन केले