राहून गेलेला चहा ☕
☀ एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर
तो दिवस पुन्हा उजाडला,
मित्रांच्या मेहनतीने अखेर
पुन्हा स्नेहसंमेलन घडून आला. 🎉
🍲 हलगी-फेट्याने झाले स्वागत,
💃 नृत्यात विसरले देहभान सारे,
🌹 गुलाबपुष्पांच्या आगमनाने
वातावरण गुलाबी झाले सारे 🌹
🌆 सायंकाळी पैठणीच्या खेळात
🧣 भाऊजींनी खेळ रंगविला,
😄 एकमेकांशी हसत-खेळत
सर्वांनी जल्लोष उधळला. 🎊
☁ अवकाशी नभ दाटून आले,
💨 थंडगार वारे वाहू लागले,
🌧 पावसाच्या मृदगंधाने
वातावरणच बदलून गेले 🌿
🎭 पैठणीच्या शब्दांनी पाय अडकून गेला
🧵 आणि पैठणीच्या खेळात
☕ तो ठरलेला आपला
एक कप चहा मात्र राहूनच गेला.
⏳ ज्याची वर्षभर प्रतीक्षा केली
🌟 ती सुवर्णवेळच हातातून निघून गेली
💛 ज्या चहासाठी मन आतुरले होते,
😞 नेमकी तीच गोष्ट करायची राहून गेली.