एकतर्फी प्रेम
प्रेम हे एकदाच करावं
त्यात ना कधी मरण असाव
एकतर्फी असल तरी
प्रेमाशी एकनिष्ठ असाव ......
डोळे झाकले की
चेहरा मनात यावा
दुःखात असलो कधी तरी
तिला पाहून चेहरा हसरा व्हावा.....
ती दुःखी असेल तर
आपल्याला ही दुःख व्हाव
कदाचित प्रेमाची ही जादू की
मन ही तिच्याकडे वळावं.....
नसेल आयुष्यात तरी
आपले प्रयत्न करत रहावं
काय माहीत एकदिवस
तिला माझं मन कळाव...
असं वाटत राहत शेवटच्या श्वासापर्यंत
तिची वाट पाहत बसावं
एकतर्फी असलं तरी
प्रेमाशी एकनिष्ठ असाव......