मी खरंच जगतोय का?
कधी कधी वाटतं… मी खरंच जगतोय का?
मला खूप फिरायचं आहे, पण मी बाहेर पडतच नाही.
मला पावसात भिजायचं आहे, पण फक्त खिडकीत उभा राहतो.
मला नदीकाठी निवांत बसायचं आहे, पण त्या वाटेकडे वळत नाही.
मला समुद्रकिनारी फिरायचं आहे, पण मी वाऱ्याशी संवाद साधत नाही.
मला गाणी ऐकायला आवडतात, पण मी ती ऐकत नाही.
मला ती गुणगुणायची आहेत, पण ओठांवर शब्दच येत नाहीत.
मला अनेक पुस्तके वाचायची आहेत, पण मी ती उघडत नाही.
मला कविता कराव्याशा वाटतात, पण मी शब्द मांडत नाही.
मला कोणाचं तरी लिहिलेलं आवडतं, पण तेही मी सांगत नाही.
मला मनमोकळं हसायचं आहे, पण मी हसत नाही.
माझ्या मनात कोणीतरी आहे, पण मी त्याला सांगत नाही.
माझ्या हृदयात भावना दाटून येतात, पण मी त्या व्यक्त करत नाही.
माझ्या आठवणींच्या कप्प्यात कित्येक गोष्टी साठलेल्या आहेत,
पण त्या उघडायचं धाडस मी करत नाही.
मला स्वप्नं पाहायची आहेत, पण मी डोळे मिटत नाही.
माझ्या मनात हजारो इच्छा आहेत, पण मी त्या पूर्ण करत नाही.
माझ्या हृदयात एक वेगळीच धडपड आहे, पण मी तिला वाट मोकळी करून देत नाही.
लोक काय म्हणतील, याचाच विचार करत मी स्वतःला हरवत चाललो आहे,
आणि शेवटी… मी खरंच जगतोय का?
की फक्त दिवस ढकलतोय?—हेच मला कळत नाही!