आत्ताच्या फसव्या जगात एका आईकडून तिच्या बाळासाठी शिकवण..
नको बाळा तु मोठा होऊ
असा हसरा तु पाळण्यामध्येच ठीक आहेस...
काय करणार बाळा तु मोठा होऊन...?
इथे जगण्यासाठी पण एकमेकांमध्येच स्पर्धा तर सुरु आहे...
कोणाशी मैत्री करावी हे ही कळणार नाही तुला..
काय करणार बाळा तु मोठा होऊन..
इथे मैत्री केलीच तर कोण तुला फसवेल हेच तुला समजणार नाही???
प्रत्येकजण स्वतःला मी किती शहाणा आणि तु किती मूर्ख हेच दाखवत आहेत...
काय करणार बाळा तु मोठा होऊन..
इथे फक्त हसत आणि गोड बोलणाऱ्यालाच किंमत आहे, भले ते खोटं ही असो किंवा कोणाच्या मनाला लागणारे असो...
काय करणार बाळा तु मोठा होऊन...
इथे स्वतःसाठी आनंदात जगणारे तुला भेटणारच नाहीत....
दुसऱ्यांना दुःखी बघून आनंद साजणारे करणारे मात्र तुला जागोजागी भेटतील ...
काय करणार बाळा तु मोठा होऊन...
इथे तुला जीव लावणारी समजून घेणारी मैत्री किंवा नातीच मिळणार नाहीत...
तुला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेणारे स्वार्थी माणसंच तर मिळणार आहेत..
काय करणार बाळा तु मोठा होऊन...
इथे तुला पैसा कमवून स्वतःला हवं ते करायचंच नाही .
दुसऱ्याने जे केलं त्यापेक्षा जास्त कमवून माज करून तुला गर्वात फिरायचं आहे ..
-✍️वृषाली गायकवाड, जाधव