कातरवेळ
तो ही हरवतो आहे
मिणमिणत्या प्रकाशात,
कशी ही संध्याकाळी
रात्र होते अलवार ओली,
जड पापण्यांच्या खाली
आठवण रोज होते,
भासत नसेल तुजला तरी
नाव तुझेच ओठी या कातरवेळी...
नयन वाट पाही तुझी त्या पायदळी
दिवा त्या तुळशीला
रोज संध्याकाळी,
नको करू जीवघेणी खेळी
आठव भेटी रम्य त्या क्षणी
नको ही आठवण उगाच या कातरवेळी...
तू माळलेला गजरा
सुवास मज अजूनही वेडावतो,
आठवून पुन्हा पुन्हा स्पर्श तुझा
नजर रोखलेली माझ्यावरची,
पुन्हा केसांत गजरा मीच माझ्या माळी
पुन्हा या कातरवेळी...
डोळ्यांच्या खुणा डोळ्यांनाच कळी
किती गोड त्या आठवणी
अशी नको लावू आस,
पावलांचे होतात मजला भास,
का दूर होत सोडलास हात?
सरता सरेना निःशब्द वेळी,
मन उदास होते
या मुसमुसलेल्या कातरवेळी...
- भाग्यशाली अनुप राऊत