का कुणास ठाऊक?
का कुणास ठाऊक ती
डोळयात पाहुनी नवे स्वप्न देवुन गेली
स्वप्नात येवुनी
झोपच उडवुन गेली
का कुणास ठाऊक ती
हदयात येऊनी मुक्काम करुनी गेली
जाता जाता हदयाची
अदलाबदल करुन गेली
का कुणास ठाऊक ती
स्वत: हसून मलाही हसवून गेली
माझ्या प्रेमात पडुन
मलाही प्रेमात पाडुन गेली