सीताराम सीताराम सीताराम काहिये
जही विधी रखे राम ,ताही विधी रहिये...
राम नाम मुख मे, राम सेवा हात मे
तू अकेला नही प्यारे ,राम तेरे साथ मे..
विधिका विधान जान, हानि लाभ सहीये...
जाही विधी रखे राम, तही विधी रहिये...
किया अभिमान तो फिर मान नही पायेगा...
होगा प्यारी वही, जो श्रीरामजी को भावे गा..
.फल,आशा त्याग कर, काम करते रहिये..
.जाही विधी राखी राम ताही विधी रहिये ...
जिंदगी की डोर सोप, हात रघुनाथ के
महलो मे रखे चाहे, झोपडी मे वास दे...
धन्यवाद निर्विवाद, राम नाम काहिये,
जहि विधी रखे राम तही विधी रहिये..
आशा एक रामजी से ,दुजी आशा छोड दे ...
नाता एक रामजी का,दुजा नाता तोड दे..
साधू संग, राम रंग, अंग अंग रंगिये...
जाही विधि राखी राम ताही विधी रहि
राम नाम घेता घेता वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला.. ज्या दगडाला पदस्पर्श झाला तेथे अहिल्या मातेचा उद्धार केला....
वारकरी व वैष्णव संप्रदायात गोकुळाष्टमी व राम नवमी हे भगवंताचे जन्म दि..अयोध्येत राम जन्म उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो तसेच गावागावांमध्ये राम प्रभूंचा जन्मोत्सव मोठ्या उल्हासाने साजरी करतात...
...पुत्र सुखापासून वंचित असलेले राजा दशरथ आपल्या तीनही पत्नींना कुलगुरू असलेले वशिष्ठ ऋषीं , गुरु पत्नी अरुंधती माता यांना नमस्कार केला....
वशिष्ठ ऋषींनी सांगितले की तुमच्या भाग्यात चार पुत्रांचा संयोग आहे... पण त्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल..यज्ञ झाल्यानंतर प्रसाद पात्रामधून पहिला प्रसाद महाराणी कौशल्य त्यानंतर सुमित्रा व राणी कैकई हिला दिला..पण राणी कैकयीला सगळ्यात शेवटी प्रसाद दिला म्हणून राग आला होता तर महाराणी कौशल्य आणि सुमित्रा यांनी दोघींमधील थोडा थोडा प्रसाद करून कैकईकही ला दिला..आणि म्हणूनच राणी केकाई हिला दोन पुत्र प्राप्त होतील असे सांगितले......
आणि त्यानंतर चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी श्रीराम जन्म झाला.. त्यानंतर भरत लक्ष्मण व शत्रुघ्न यांचाही..
संपूर्ण आयोध्या नगरीत राजकुमारांच्या स्वागतासाठी भव्यदिव्य आयोजन करण्यात आले... घरोघरी आनंद झाला... आज राज्याला सुखाचे तोरण लागली होती.. त्यांना विद्या प्राप्ति साठी आचार यांकडे पाठवण्यात आलं... तेथूनच ते सर्वगुणसंपन्न होऊन आली... जे यज्ञांमध्ये विघ्न आणत होते असे अनेक असुरांचा पराभव केला....
अहिल्या मातेचा उद्धार, सीता स्वयंवर, त्यानंतर 14 वर्ष वनवास, या वनवासा दरम्यान ताडका मर्दन,
शूर्पणखा सी युद्ध, मारीच मर्दन, सीता अपहरण, श्री राम भरत भेट, शबरी भेट, बाली सुग्रीव तसेच भक्त हनुमंत यांचे सहकार्य, त्यानंतर सातासमुद्रापार असलेली लंकेचा शोध, बिबीशन हनुमंत भेट,राम-सिता मुद्रिका मिलन, रामसेतू, अंगद रावण भेट,बिभीषण सहकार्य, घनघोर महायुद्ध, कुंभकर्ण वध, इंद्रजीत वध, लक्ष्मण आस लागलेले मुरचीत अवस्था, त्यासाठी द्रोनागिरी पर्वत आणलेला, व त्यानंतर झालेले रावण दहनाच्या श्री राम लीला आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच.. (त्या विस्तारा ना नंतर कधीतरी सांगू)..
बिबीशनास राज्याभिषेक, श्रीराम सीता भेट, सीतेची अग्निपरीक्षा व त्यानंतर अयोध्येत झालेले आगमन... पुन्हा एकदा अग्निपरीक्षा, पुन्हा काही वर्षातच माता सीता यांचा झालेला विरह, केलेला त्याग, अरण्यात लव-कुश यांचा जन्म.. त्यानंतर लव कुश यांचे महासेनेसी व साक्षात श्रीरामचंद्राची युद्ध, सीतेचाया धरतीचा ऊदरात सामावलेली.. अशा अनेक लीलांचा सामावेll
श्रीरामचरितमानस मधी संपूर्ण उल्लेख हे श्रीराम स्तुतिस्तवन खूपच सुंदर आहे , श्री राम रक्षा देखील तुम्ही एकदा नक्की वाचून बघा..
श्री प्रभु विषयी लिहिले तरी कमीच...
दयेचा शांतीसागर कृपाळू, मर्यादा पुरुषोत्तम, सुंदर मेघश्याम ,दशरथ नंदना, कैवल्य मूर्ती, चराचरातील स्पुर्ती, कौशल्या नंदन, हृदय निवास, पत्नी परायण, एक पत्नी व्रत,सितापती, श्री राम चंद्रा ना मानवंदना...
श्री रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खुप शुभेच्छा....✍️✍️💞Archu💞