*माझ्यातला परमेश्वर*
जीवनात नाही कळले,
हे शरीर आहे नश्वर !
पाहिलाच नाही कधी मी,
गड्यांनो माझ्यातला परमेश्वर !
दारु , पार्टी , मटणाची मी,
अशी काही खैरात केली .
धुमधडाक्यात बेभान नाचून,
अनेक मित्रांची वरात केली.
तेच सारे दोस्त मला ,
पोहचवायला आले आहेत !
माझी उष्टी दारु माझ्यासमोर,
मनसोक्त रिचवायला आले आहेत !
ही सारी मोहमाया आता,
आहे का बरे अजरामर ?
पाहिलाच नाही कधी मी,
गड्यांनो माझ्यातला परमेश्वर !
दर्शन जोशी
संगमनेर