Marathi Quote in Poem by Reshma

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

सांजवेळ


एका सांजवेळी सुर्य परतण्‍याच्‍या मार्गावर होता.
जाता जाता आपल्‍या प्रेमाचे सोनेरी रंग जागाला देत होता


त्‍याच ते मनमोहक रुप पाहून सर्वांग शहारु लागल.
जनू प्रितीच वारं मनामध्‍ये वाहू लागल.


आठवते अशीच एक कातरवेळ जेंव्हा झाली होती अमुची भेट.
नजरेचा तो पहिला कटाक्ष ह्वद्यापर्यंत जाऊन पोहचला होता थेट.


एकमेकांच्‍या सहवासात शब्द तेंव्हा मुके होते.
अनमोल अशा संधीत नजरेचे काम जेंव्हा चालू होते.


मग रोज  एकमेकांना भेटण्‍याची सवय होऊन गेली,
हळूहळू प्रेमाने मनामध्‍ये आपली गती वाढवली.


एक दिवस तो म्हाणाला, तुला आपल्‍या विरहाच दु:ख सहन करायच आहे
सिमेवर तनाव वाढल्‍याने ऊद्‍या मला निघायच आहे.


त्‍याचे ते शब्द ऐकताच मि अगदी स्तब्ध झाले.
उद्‍याच्‍या विरहाने मला जनू आजच मुग्ध केले.

जाता जाता त्‍याने मला न रडन्याचे बंधन घातले.
अशक्‍य अशा गोष्टिने जनू यक्ष प्रश्णात टाकले.


त्‍याला निरोप देताना ओठावर हसू आणी डोळ्‍यात पाणी होते.
तो निघुन गेला तरी त्‍याच्‍या वाटेवर मन माझे रडत होते


आजही त्‍याच्‍या वाटेवर नजर माझी फिरत असते
मि आणि माझी नजर आम्हा दोघींच्‍या सोबतीला या सांजवेळेची साथ 
असते.

Marathi Poem by Reshma : 111575168
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now