ही "ती "पंचीमी नाही !
नटून थटून नागोबाला जयायच ,
ही ती पंचमी नाही......
घरातच बसून गोड धोड खायायच ,
हीच ती वेळ आहे....
झोक्यावर बसुन आकाशाकडे झेप घ्यायची,
ही ती पंचमी नाही....
पण हं,
घरातच बसून आकाशाएवढे स्वप्न पाहायची ,
हीच ती वेळ आहे...
बाईंनो-ताईंनो एकत्र येऊन शिराळा करण्याची ,
ही ती पंचमी नाही.....
घरी राहून सुरक्षतेचा विचार करण्याची,
हीच ती वेळ आहे......
अरे पठ्ठयानों सठ्ठा खेळण्याची ,
ही ती पंचमी नाही...
सठ्ठायात लावत होता ते पैसे दान करण्याची,
हीच ती वेळ आहे...
सण आहे म्हणून गावाकडे जायायची,
ही ती पंचमी नाही....
घरी राहून सुरक्षतेची जबाबदारी घ्यायची,
हीच ती वेळ आहे....
"मी माझा रक्षक "
हे सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे.
- Gauritanaya shinde