जीवनात एकमेकाना समजून घेतलो तरच जीवन जगणे शक्य आहे. अन्यथा एकटा जीव सदाशिव किती दिवस जगणार आहोत. म्हणून मित्र असो की पती-पत्नी किंवा इतर कोणी जोपर्यंत एकमेकाना समजून घेत नाहीत तोवर जीवन फक्त जगतो आहोत मात्र त्यातला आनंद नावाची वस्तू त्यात नसते. रोजचा दिवस उगवतो आणि मावळतो देखील. पण दिवसात काही चांगल्या बाबी घडल्या तर तो दिवस संस्मरणीय ठरते.