परिचय म्हणजे समोरील माणसाची ओळख होय.भारताने आपले नागरिक ओळखण्यासाठी जे ओळखपत्र काढले ते आधारकार्ड होय. तर निवडणूक आयोगाने मतदार असल्याचे ओळखपत्र म्हणजे मतदानकार्ड होय. तसेच प्रत्येक ठिकाणचे आहे. बॅंक, पोस्ट आॅफिस, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी ओळखपत्रे हे सर्व त्या माणसाची परिचय सांगणारी साधणे आहेत. त्यावरून समोरील मुलगा व आव्यक्ती कोठे, काय करते याचा आपल्याला परीचय होतो. समोरील व्यक्तीचा परीचय असल्याशिवाय मनातील भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नाही. माणसाचा विविध भाव-भावना या परीचयाशी निगडित असलेल्या आपल्याला दिसतात.
एखाद्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेले असता आपण परीचयपत्र देतो. त्याला आपण बायोडाटा म्हणतो. यामधून समोरील व्यक्ती नाव गाव कोणते , काय शिक्षण झालेले आहे,आजपर्यंत त्या क्षेत्रातील काही अनुभव, काही इतर इंत्मभूत माहिती मिळते. आजकाल वधू-वर परिचय मेळाव्याचे सूध्दा आयोजन केले जाते आहे. यामधून त्या मुलगा किंवा मुलगी विषयी सर्व माहिती मिळून वय, आवड-निवड, नोकरी अशी माहिती मिळते. भावी आयुष्यासाठी हे परीचय मेळावे उपयोगाचे ठरतं आहे.
प्रत्येक माणूस आपल्या परिचयाने गावात, देशात,जगात आपली ओळख निर्माण करत असतो. त्यामुळे माणसाचा परिचय हा त्याचा आरसा आहे. सतत या आरशात जर डोकावत राहीलो तर नक्किच एक चांगला माणूस होण्यासाठी त्याचा उपयोग होईल.