तू समोर असताना कधी बोलणं तुझ्याशी जमलं नाही
Hi, hello पासून सुरू झालेलं आपलं नातं love you पर्यंत कधी पोहोचलं हेच मला कळलं नाही ।
आयुष्याच्या वाटेवर एकटा चालत असताना मिळाली तुझी साथ मला
गुंतत गेलो तुझ्यात आणि मीच माझाच राहिलो नाही ।
खूप चुका पाठीशी घालून नेहमी समजून घेतलंस मला
प्रेमा शिवाय अजून कोणतीच अपेक्षा तू ठेवली नाहीस ।
दूर राहत असलो तरी नातं आपलं जपत राहीलीस
प्रेम एवढ केलंस की विश्वास तुटू दिला नाहीस ।
तू नेहमी बोलतेस की सोडून जाणार नाहीस ना रे मला,
मस्करी मध्ये जरी बोलत असशील तू पण....
"तुझ्या शिवाय" हे शब्दच मुळी मला मान्य नाहीत |
आपल्या गोड आठवणीतले काही क्षण आठवले की चेहऱ्यावर हळूच हसू येतं
आठवणीत तुझ्या असताना भान माझं मला राहत नाही ।
#Enjoy