jigsaw puzzle#
पिलू फार अस्वस्थपणे काहीतरी शोधत होती.समोर पडलेले पझलचे रंगीबेरंगी तुकडे तिला आत्ता खुणावत नव्हते.कारण ते चित्र पूर्ण होत आलं होतं.धडपड करुन तिनेच ते जोडलं होतं कंगोरे,आकार,चित्र सगळं सगळं सांभाळून विचारपूर्वक.... पण आता तिच्या लक्षात आलं की माझं चित्र अपूर्ण राहतं आहे... का बरं???? तिचं तिलाच कळलं की त्या पझलचा एक तुकडा तिने स्वतःच कधीतरी भिरकावून दिला होता.आता तिला त्याच तुकड्याची "किंमत" आणि "अस्तित्व"महत्वाचं वाटायला लागलं.ती पुरती अस्वस्थ झाली.... मग मीही लागले मदतीला...तिची अस्वस्थता कमी करायला... सापडला "तो"तुकडा!!! पण आता तो त्या चित्रात बसण्यासारखा नव्हता राहिला.. आकार तुटला होता,पुठ्यावरचं चित्र थोडं फाटलं होतं.आता कसा जोडला जाणार हा???
नात्यांचंआणि भावनांचंही असच आहे की आपल्या आयुष्यात.रागाच्या आणि अभिनिवेशाच्या भरात देतो फेकून एखादा तुकडा आपण लीलया आणि मग आयुष्याचं चित्र जुळवायला बसलो की होते उपरती.पण आता जुळणार असतो का तुकडा आपल्या मनासारखा? त्यापेक्षा अधीच नीट सांभाळला असता तर......