।"श्रीसूक्त"
"ऋचा १४"
आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् | सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||१४||>
अर्थ:--हे अग्ने,त्वम-तू,मे-माझ्या,गृहे-घरी
आर्द्राम-पूर्वी सांगितल्या प्रमाणे अभिषेक जलाने आर्द्र किंवा अपार करुणेने जिचे हृदय आर्द्र म्हणजे द्राविभूत झाले आहे अशा,य:करिणीम:-
जिच्या हातात सदैव धर्मदंड आहे अशा
आणि यष्टीम-दंडस्वरूप असलेल्या,
सुवर्णाम-सोन्याप्रमाणे जिची कांती आहे अशा,हेममालिनीम--सुवर्णपुष्पांची माला धारण करणाऱ्या
सुर्याम:-सुर्याप्रमाणे चराचराला प्रकाश
पुरविणाऱ्या आशा,लक्ष्मीम म्हणजे
लक्ष्मीला आवह- बोलाव.
या मंत्रात लक्ष्मी ही दंडधारीणी आहे असे ऋषी सांगत आहेत,ऐश्वर्याबरोबरच त्या ऐश्वर्याचे नियंत्रण करण्याची जर संयमशक्ति नसेल तर ते ऐश्वर्य घातक
ठरेल.ती आसुरी संपत्ती मानावी लागेल.
म्हणून यष्टीम शब्दाने संकेत केला आहे.
ऐश्वर्याला दैवी गुणांचे तेजोवलाय प्राप्त
होत असते.अशी दैवी गुणांनी चराचराला
संतृप्त करणारी भाग्यलक्ष्मी,माझ्या कडे
यावी,माझ्या वंशात अक्षय राहावी असा
महत्वपूर्ण आशय या मंत्रात प्रकट झाला
आहे.