फक्त तुझी साथ हवी....
कधीतरी फक्त बोलणे सोडुन
कर भेटण्याचा हट्ट।
कधी तरी माझ्या मनाला
घे तुझ्या मिठीत घट्ट।।
अपेक्षा माझ्या जास्त म्हणून
होऊ नको दुःखी।
बाकी नाही नाही जमले तरी
हे एक जमेल तुला नक्की।।
आयष्यभरासाठी हात माझा
तुझ्या हातात धर।
तुझं निर्मळ प्रेम तू
माझ्यावर मनापासून कर।।
जपणार तुला मी
जशी राजाची राणी।
त्यासाठी ह्या मनाला
फक्त तुझी साथ हवी।।
© दिपकरिंगे