लगीन लोकांच नाचतंय येड्याभोकाच
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फारद दब्रटो यांची एकमताने निवड झाली.
मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून नेहमीच रस्सीखेच पहायला मिळते. ढोरेबाई नंतर फादर एकमताने निवड झालेले अध्यक्ष. बहुतेक सर्वच साहीत्यकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण वादविवाद विना होणार नाही ते साहीत्य संमेलन कसले.
विश्व हिंदू परिषदने फादर दब्रुटो यांच्या निवडीवर आक्षेप नोंदविला. एका क्रिश्चन फादरला साहीत्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊ नये. पण साहित्य संमेलन हे फक्त एका धर्माची मक्तेदारी कधीच नव्हती. मराठीत साहीत्य लिहणारे सर्वच साहीत्यीकच असतात. लेखक, कवी, यांना जात, धर्म, पंथ, लिंग, यांचे कोंदण कधीच नसते. त्यामुळे असला वाद उकरून काढणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे.
हिंदू परिषदेचे प्रवक्ता म्हणत होते, फादर यांचे साहीत्य हे ख्रिश्चन धर्माचे प्रसार करणारे आहे. ज्याला मदर तेरेसा यांच्यावर लिहलेले चरित्र साहीत्य, जर धर्मप्रसारक वाटत असेल तर त्यासारखा षंढ पुरूष कोणीच नसेल. 'ख्रिस्ताचा जिवनप्रवास' हे पुस्तक ख्रिश्चन धर्मप्रसार करणारे नव्हे तर एका महान विभुतीच्या जीवनाचा माग घणारे साहीत्य नक्कीच आहे. बहुतेक फादरवर टिका करणार्या महान साहीत्य वैज्ञानिकांनी एकदा फादरचे साहीत्य नक्कीच वाचावे.
जर त्यांनी लिहलेली पुस्तके जर धर्मप्रसार करणारी वाटत असतील, तर भारतीय द्रोपदी, मृत्युंजय, ययाती, इत्यादी अनेकानेक पुस्तकेही धर्मप्रसारक म्हणुनच पहावी लागेल.
फादर दब्रुटो हे एक संवेदनशील व्यक्तीमत्व आहे. त्यांनी कॅथलिक चौकटीच्या बाहेर डोकावून ख्रिश्चन लोकांना पहायला लावले. नेहमीच लेखनीतुन निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत आवाज उठवला. त्याचेच फलित म्हणून एकमताने सर्व साहित्यिकांनी त्यांची अध्यक्षपदी निवड केली.
विश्व हिंदू परिषद, किंवा तत्सम घटकांनी उगाच नाचु
नये. किंवा सोशल मीडिया वर तथाकथित बुध्दीमंतानीही आपली अक्कल पाजळू नये. मराठी साहित्य संमेलन हे साहीत्यकांचा सण आहे. त्यांचा पर्व, त्यांची मराठी अस्मिता आहे. ज्याच्याशी आपला संबधच नाही तेथे कशाला उगाच बोटं घालायची.