Marathi Quote in Poem by Jigna Sampat

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आठवणी

अनेक प्रसंग अनेक आठवणी,अनेक प्रसंगांच्या त्या एकत्र साठवणी
दाटुन येते डोळ्यांत पाणी,जेव्हा आठवतात आठवणी !!!

रडणाऱ्याला हसवतात आठवणी,हसणाऱ्याला रडवतात आठवणी
भूतकाळाची सैर करवतात आठवणी,मरणाऱ्याला पुन्हा जगवतात आठवणी !!!

आठवणी म्हणजे लहानपणी खेळताना झालेली ती जखम
आठवणी म्हणजे आई बाबांनी मायेनं लावलेला तो मलम !!!

आठवणी म्हणजे शाळेत मित्रांसोबत केलेली मजा
आठवणी म्हणजे शिक्षकांनी सर्वांना एकत्र दिलेली सजा !!!

आठवणी म्हणजे कॉलेजची ती यारी
आठवणी म्हणजे मित्रांसोबत शिकलेली दुनियादारी !!!

आठवणी म्हणजे रस्त्यात पहिल्यांदा सापडलेले नाणें
आठवणी म्हणजे पहिल्यांदा गायलेले ते गाणें !!!

आठवणी म्हणजे खेळलेला खेळ
आठवणी म्हणजे कधीही परत नं येणारा वेळ !!!

आठवणी म्हणजे प्रेम आणि विरहाची शिकवणी !!!
आठवणी म्हणजे सुखं आणि दुःखाची मेजवानी !!!

अनेक प्रसंग अनेक आठवणी,अनेक प्रसंगांच्या त्या एकत्र साठवणी
दाटुन येते डोळ्यांत पाणी,जेव्हा आठवतात आठवणी !!!

Marathi Poem by Jigna Sampat : 111233414
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now