*??‼आनंदी सकाळ ‼?*
*?प्रार्थनेला यश देणारी?*
*✍'सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः' हे आमच्या सनातन संस्कृतीचे ब्रीद.*
*✍जगातील सर्वजनच काय पण सर्व प्राणीमात्रांनीही आनंदाने जगावे ही आमची मनीषा. या देशाने कधी कुणावर आक्रमण केले नाही. शांतता प्रिय देश ही आमची ओळख.*
*✍या देशाचा आदर्श श्रीकृष्ण. "फळाची अपेक्षा न करता निष्काम कार्य करा" ही त्याची शिकवण.*
*✍अधर्माने कहर केला तर त्याचा विनाश करण्यासाठी मी अवतार घेईल हे त्याचे गीतावचन.*
*✍हे कृष्ण भक्तीगीत १९६५ साली प्रदर्शित झालेल्या 'खानदान' चित्रपटातील.*
*??त्याच कालावधीत भारतावर पाक ने आक्रमण केले. हा देशाला मोठाच धक्का होता. हे युद्ध जवळपास सहा महिने चालले यामुळेच कदाचित गीतकार राजिंदर किशन ह्या गीतात प्रश्न करीत आहेत की..*
*✍आम्हाला रक्षणाची हमी देणारा तो कन्हैया कुठे आहे ? फारच वेळ लावला त्याने यायला.*
*अखेर ह्या युद्धात पाकला भारताने अशी अद्दल घडवली की त्यांना लाहोर पर्यंत मागे हटवले.पण त्यामुळे भारताच्या अतुलनीय शौर्याची जगाला ओळख झाली.*
*??उशिरा येण्यामागेही ही कृष्णनीती असावी. २३ सप्टेंबर ६५ ला भारताच्या विजयानंतर हे युद्ध थांबले. जगातील कुणाच्या अधेमधे नसणारा..*
*??सहिष्णू.. शांतताप्रिय देश प्रसंगी अचाट पराक्रमाने युद्ध जिंकूही शकतो असा नावलौकिक भारताचा जगात झाला.*
*✍ज्या दिवशी भारताने पाक वर विजय प्राप्त केला त्याच दिवशी २३ सप्टेंबर १९६५ ला हा 'खानदान' चित्रपट प्रदर्शित झाला. व्याकूळतेने केलेला कृष्णाचा धावा कामी आला. *
*?परमेश्वर संकट पाठवतो पण परिक्षा घेत त्यातून नाव पार करुनही देतो.*
*✍उलट नंतर प्रगतीचा राजमार्गही प्रशस्त करतो..*
?????????
*_बड़ी देर भई नंदलाला_*
*_तेरी राह तके बृजबाला_*
*_ग्वाल-बाल इक-इक से पूछे_*
*_कहाँ है मुरली वाला रे_*
*_बड़ी देर भई नंदलाला_*
*_कोई ना जाए कुञ्ज गलिन में,_*
*_तुझ बिन कलियाँ चुनने को_*
*_तरस रहे हैं जमुना के तट, धुन मुरली की सुनने को_*
*_अब तो दरस दिखा दे नटखट, क्यों दुविधा में डाला रे_*
*_बड़ी देर भई नंदलाला..._*
*_संकट में है आज वो धरती, जिस पर तूने जनम लिया_*
*_पूरा कर दे आज वचन वो, गीता में जो तूने दिया_*
*_कोई नहीं है तुझ बिन मोहन, भारत का रखवाला रे_*
*_बड़ी देर भई नंदलाला..._*
?????????
*गीत : राजिंदर किशन* ✍
*संगीत : रवि*
*स्वर : महंमद रफी*
*चित्रपट : खानदान (१९६५)*
*?सुमंगल प्रभात?*
??‼विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ‼?