# Kavyostav 2.0
विषय : अध्यात्म
मुक्त
सोड घरटे तोड बंध
उधळून टाक श्रृंखला
रे मना घे भरारी
वणवा कधीचा पेटला
कां जळशी कां झुरशी
जर काहीच नाही आपुले
जे होते इथलेच होते
सारीच ती कागदी फुले
राग लोभ व्देष मत्सर
आसक्ती आणि बंधनं
निरर्थक मिथ्थाच सारे
सत्य जागृक स्पंदनं
आत्म्याचा परमात्म्याशी
थेट चालला संवाद रे
नेणिवेच्या पल्याड गेला
जाणिवांचा हा वाद रे
मोह माया भास फक्त
प्राक्तनांचे जाळेच ते
अडकू नको आता कुठेही
बोलावणे बघ आलेच ते
घे समाधी हो मुक्त तू
देहाची या फिकीर कशास
ज्या मातीतून आला होता
त्याच मातीस अर्पिला आज..
- मीनल
*********************************