मरणोपरांत!
‘अप्पा साहेब खूप स्र्हुदय होते !
‘त्यांच्या अंत:करणात अपार करुणा होती.!’
‘अप्पा म्हणजे, राजा माणूस!’
‘अप्पा माझा बालमित्र ,कवी मनाचा.त्यामुळे व्यवहारात ठेचाळत असे.!’
‘अप्पा कधी खोट बोलत नसे , प्रामाणिक माणूस !’
‘एखाद्यावर प्रेम कसे करावे ,हे अप्पा कडून शिकावे !’
‘ते सुंदर चित्रे काढत, पण कधी त्याचे प्रदर्शन केले नाही,निगर्वी माणूस ! ‘
‘एकांतप्रिय होते,फरसे कोणात मिसळत नसत ,पण तुसडे नव्हते .!’
‘पाठच्या भावासाखे माझ्यावर प्रेम केले हो माझ्यावर ! ‘
‘वडीलधार्याचा मान राखत,कधी दुरोत्तर केले नाही,मला ते वडिलाच्या जागी मानत .दसरा,दिवाळी,पाडवा,आवर्जून पाया पाडायला येत !’
‘खूप नम्र होते.!’
‘आमचे मतभेद होते ,पण त्यांनी कधी शेजार-धर्म सोडला नाही.संक्रांतीला मुद्दाम तीळगुळा साठी येत.!”
हे सारे एकून खूप बर वाटतय. खरच मी इतका चांगला होतो !? अरे, हे असे कौतुक ऐकण्यासाठी सारे आयुष्य व्यथित केले.! यातला एखादा तरी शब्द मी जिवंत असे पर्यंत का नाही म्हणालात ? थोडा आनंद मलाहि नसता का झाला? दोन दिवस ज्यास्त जगाव नसत का वाटल?
सु. र. कुलकर्णी.