स्त्री ......एक अस्तित्व
आजच्या काळात स्त्री स्वतः च अस्तित्व स्वतः निर्माण करू लागली आहे.प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ लागली आहे. खंबीरपणे पायावर उभी राहून जगाशी लढत आहे. कधी तिच्या वाटयाला मान किंवा अपमान येतो तरी ती सहन करत असते.स्त्री अशी देणगी आहे.ती प्रत्येक रुपात वेगळी दिसते. प्रत्येक नात्यात तिच वेगळ असंं रुप आहे.स्त्री एक अद्भुत आहे. प्रत्येक जण बोलतो ती खूप हळवी आणि नाजूक आहे. पण या मागे तिच्या भावना लपलेल्या असतात.कधी ती आई असते, कधी ती बहीण असते, कधी ती कोणाची तरी मुलगी असते, कधी ती मैत्रीण असते.अशी तिची वेगवेगळी रुप आहेत.तिला अस स्वतः च अस काहीच नसतं.तिला स्वतः च्या मनाप्रमाणे जगता येतच नाही कधी. कधी तरी तिच्या पण विचार करत जा.अस म्हणणारे खूप जण असतात. पण खरंच तिचा विचार केला जातो का?हा तर.मला पडलेला प्रश्न आहे.
स्त्री एक समजून घेणारी व्यक्ती आहे. हा गुण तिला निर्माण करावा लागतच नाही. तिच्या मध्ये तो सामावलेला आहे. जेवढी ती हळवी असते तेवढी ती कठोर पण आहे. तिला कठोर वागायला नाही आवडत पण परिस्थिती तिला भाग पाडते.आजच्या शतकात स्त्री अत्याचार खूप होतात. स्त्रीला सुरक्षित अशी जागा नाही.प्रत्येक स्त्रीच्या मनात घराबाहेर पडताना भीती असते. तिला याची काळजी असते आपण सुरक्षित घरी पोहचु की नाही.प्रत्येक ठिकाणी तिचं माघार घेते.जगात अशा काही स्त्रिया आहेत त्यांना बंधनात जगाव लागतं अस का?हा पण एक प्रश्न.समाजात अशी काही कुटुंब आहेत मुलगी आणि मुलगा याच्यात भेदभाव केला जातो. अशी पण कुटुंब आहेत ज्यांना मुलगी नाही ते दु:ख करतात...reshu