शाळा भरली पक्षांची, हातात वही पानांची
पोपट राव झाले गुरु लेक्चर केला सुरू
मिटू मिटू शिकवायची, होती फार घाई
कामावरून आली नाही अजून,
शाळेत चिमुकली चिउताई...
किलबिलाटाने पक्षांच्या पोपट राव झाले त्रस्त
चिउताई सोडून नाही कुणामध्ये शिस्त
एक दोन दिवस गेले कुठे दिसेना चिउताई
शोधण्यास निघती सारे रांनो वनोमाई...
चिउताईसाठी सोडले सार्यांनी हातातली कामे
सांजवेळ झाली अजुनी चिउताईचे घरटे रिकामे
शोधता शोधता मैनेला चिउताई दिसली
पण भेट घडेल कशी, मानवाच्या पिंजर्यात फसलेली
शो पिस समजूनी मानवाने घराबाहेर टांगलेली
बंदिस्त करुनी पक्षांची शाळा बंद पाडलेली
संमद आयुष्य चिउताईच पिंजर्यातच गेल
मुक्तपणे फिरण्याच जगणं डोळ्यात साचलं