आज दुपारी टी.व्ही.वर एलियंसचा कार्यक्रम सुरू होता. त्यांच्या अस्तित्वाची चर्चा चालू होती. काहीनाच कसे दिसतात आणि सर्वांनाच का दिसत नाही हा विषय होता.
दिवसभर हाच विचार मनात घोळत होता. खरचं एलियंस असतील का? असतील तर ते कसे दिसत असतील? अशा विचारातच झोप लागली.
स्वप्नात माझ्या शरीरातून एक अनोळखी आक्रुती उठून उभी राहिली. असा चेहरा मी आयुष्यात पहिल्यांदाच पहात होतो. चेहरा एकदम मोठा .चेहर्याशी विसंगत गोलगरगरीत मोठे डोळे, निमूळती हनुवटी, हडकुळी बुटकी शरीरयष्टी. सगळच विचीत्र होत.
मी घाबरून त्याला विचारले, अरे कोण आहेस तू?
अरे मी तोच ज्याचा तु दिवसभर विचार करत होता. एलियंस. मंगळावरचा माणूस. आणि एक सांगू ? मी तुला जसा दिसतोय ना तसाच तूही मला दिसतोस. अगदी माझ्या सारखाच. भारतीय एलियंस. हा..हा..हा..
माझी झोप उडाली .छाती धडधडत होती. सगळ्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. खरचं मी तसा दिसतो का?
मोबाइल घेतला आणि सेल्फी काढली.
बघून डोळे विस्फारले.मी असा दिसत होतो.
बघायचा माझा फोटो? बघाच तर मग.
्