Marathi Quote in Hiku by Nitesh Dhalape

Hiku quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

तू समजू शकली नाहीस

तुझ्या रूपावर नव्हे तर
तुझ्या मनावर मी प्रेम करत होतो
पण तु समजु शकली नाहीस मी कोण होतो

तुला पाहण्यासाठी मन कासावीस व्हायचं
तुला पाहिलं की मन भरून यायचं
तुझा विसर कधीच होऊ नये असं व्हायचं
पण तू समजू शकली नाहीस मी कोण होतो

तु जेव्हा आली नजर कासावीस झाली
तुझ्या नजरेला नजर मिळवून जणू हरवून गेलो
पण तू समजू शकली नाहीस मी कोण होतो

तुझं अवघ रूप मणी ठसले
तुलाच पहावत रहावं असे वाटले
तुझ्यावरची माझी नजरच कोणाकडे जाऊ नये असं वाटले
पण तू समंजू शकलीस नाही मी कोण होतो

तुझे लूक लुकणारे डोळे जसे
आकाशातील लूक लुकणारे चंद्र - तारे
तूझ्या लूक लुकनाऱ्या पापण्याचा भास जणू माझ्याशी संवाद साधायचा
पण तू समजू शकली नाहीस मी कोण होतो

तू बोलत असलीस की असं वाटायचं
तू फक्त माझ्याशी बोलत रहाव
दुसरं कोणाशीच बोलु नयेस
हे बोलण कधीही हरवू नये असं वाटायचं
पण तू समजू शकली नाही मी कोण होतो

लेखन:- नितेश धलपे

Marathi Hiku by Nitesh Dhalape : 111063010
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now