वय झाल्यावर जर तुम्हाला कोणी म्हणेल की तुम्हाला काही कळत नाही तर तर नक्की समजा तुम्हाला आयुष्यात खरच काही कळल नाही.
मुलांना शाळेत घेऊन जातांना मुलांच्या हातात दिलेले बोट ते केव्हा तरी सोडणार आहेत हे तेव्हाच कळायला पाहिजे होते.
मर मर मरुन मुलांना सुशिक्षित करतांना ते पुढे आपल्यालाच अशिक्षित ठरवतील हे तेव्हाच कळायला पाहिजे होते।
मोठ्या उत्साहात , आनंदाने सुन घरात आणतांना आपणच आपल्या घरात परके होऊ हे तेव्हाच कळायला पाहिजे होते.
आयुष्यभर खस्ता खाऊन,जमविलेली कवडी कवडी मुलावर उघळतांना आम्ही च तुम्हाला पोसतो हे ऐकायला लागेल हे तेव्हाच कळायला पाहिजे होते.
हे सगळं तेव्हाच कळलं असते तर आज हे मानहानीकारक जीवन वाट्याला आलं नसते.
तरूणानो, सावध व्हा. तुम्ही पण म्हातारे होणार आहात.