मनात खूप येतं पण बोलता येत नाही
शब्द पिंगा घालतात पण कागदावर उतरत नाही
विचारांचे काहूर डोक्यात घोंघावत असतं
मोकळ व्हायला मात्र कोणी मिळत नाही
सुखाच्या सागरावर दुःखाच्या लाटा कोसळतात
किनार्याला मात्र
त्याच सोयरसुतक नाही
दुःखाचे कढ आतल्या आत जिरतात
उसन हासू आणत माणूस
जगणं सोडत नाही
विचारांच आभाळ जेव्हा खूप भरून येत
शब्दांचे अश्रू होणं तेव्हा थांबत नाही