तुला अशी कधी भेटलेच नव्हते रे यापूर्वी...
हळूहळू जागा होत होतास तू....
किनार्यावरच्या होड्या तुझ्याकडे डोळे भरून पाहत होत्या...
आकाशाची निळाई तुझ्यात मिसळून गेली होती...
तुझं हिरवं निळेपण कसं गहिरं अथांग....
लाटांमधून पोचवलंस तुझ्या अंतरातलं खोल खोल खूप काही... माझ्यापर्यंत..
माझ्या पावलांशी लोळणच घेतली त्या भावनेने जणू,
मी निःशब्द उभी तुला अनुभवत,
तुझे अथांग,गहिरे आणि खोल खोल निळेपण स्वतःमधे सामावून घेत....
क्षितीजाला टेकलेली माझी नजर आणि वाळूत रूतलेली पावलं....
आर्या जोशी