#Kavyotsav - प्रेम
एक जरा....
तुझ्या मनातले भाव,
माझ्या मनाला कळू दे
प्रतिबिंब माझे मला,
तुझ्या डोळ्यात दिसू दे....
भास तुझे ह्या नभाशी,
मेघ होऊन दाटले
वृक्ष बहरले पुन्हा,
रंग मनात साठले.....
प्रीत उमलली आज,
मनी पहिल्या सरिची
आस लागे पुन्हा का,
मला पहिल्या भेटीची...
तुझ्या आठवांचे मेघ,
बरसे आज माझ्या मनी
हळूवार सांगे वारा,
एक साद घाली कुणी...
मला बोलवती पुन्हा,
बघ भिजलेल्या वाटा
सांग थांबवू कशा मी ?
माझ्या मनातल्या लाटा....
कवी:- ओमकार . तांदळे
मुंबई . mob no. 8356993809