विषय - नाती
शीर्षक - ताई
मायेची ती सावली
काळजी दर पाउली ,
आजची उत्सवमूर्ती
माझी ताई !
कधी आधार
कधी मनोबल ,
सार्थ विश्वास माझा
माझी ताई !
कधी शिक्षिका
कधी होई मैत्रीण,
जिवाभावाची सखी
माझी ताई !
संकटात वटवृक्ष
करी मनासी निर्भय ,
इंस्पिरेशन चा झरा
माझी ताई !
असा मी भाग्यवंत
झाले धन्य हे जीवन,
कुबेराची कुंजी
माझी ताई !
- अमेय जोशी
#kavyotsav