#Kavyotsav
# काव्यतोसव
भावना -वियोग, भक्तिभाव
कविता -पुढच्या वर्षी लवकर या ।।
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
----------------------------------------
निरोप बाप्पांना देऊ या
आग्रह त्यांना करू या
गणपतीबाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या ।।
उत्सव साजरा झाला
आनंद सर्वांनी घेतला
कलागुण दर्शन मेळा
बाप्पांच्या समोर झाला ।।
सजावटी देखण्या किती
पाहण्या गर्दी अलोट ती
देखावे वास्तव सारे होते
समाज प्रबोधन झाले ते ।।
बाप्पा तुमच्या दर्शना
भक्तजन श्रध्दने येती
कृपा असावी तुमची
या साऱ्या भक्तांवरती ।।
आज बाप्पा निघाले
मन खूप जड झाले
निरोप त्यांना देऊ या
पुढच्या वर्षी लवकर या ।।
गणपतीबाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या ।।
-----------------------------------------------
कविता- पुढच्या वर्षी लवकर या ।।
-अरुण वि.देशपांडे- पुणे
9850177342
---------------- ------ -----------------------