नाश्ता टाईम..
🩸मिक्स डाळींचा उत्तप्पा
🩸साहित्य
अर्धी वाटी मूग
अर्धी वाटी मसूर.
अर्धी वाटी उडीद
पाव वाटी तूर डाळ
रवा एक वाटी
बारीक चिरलेला कांदा
गाजर कीस
कोथिंबीर
बारीक मिरची चिरून
मीठ चवीनुसार
🩸कृती
रात्री सर्व डाळी एकत्रित भिजवुन ठेवल्या
सकाळी बारीक करून त्यात
रवा घालून ठेवला
मिश्रण दोन तास झाकून ठेवले
दोन तासांनी गरम तव्यावर उत्तप्पा घालून
वरती कांदा कोथिंबीर आणि गाजर कीस पसरून दोन्हीकडून छान भाजून घेतला
🩸सोबत घरच्या नारळाची घरचीच कैरी वापरून केलेली चवदार हिरवी गार चटणी
बेस्ट ever ♥️
🩸भाजलेल्या जाम लावलेल्या ब्रेड वर केळी आणि स्ट्रॉबेरी तुकड्यांची फ्रुट संगत..