"कुलस्वामिनी रेणुका माता"
प्रत्येक घराण्याची कुलदेवता असते व त्या प्रमाणे कुलधर्म , कुलाचार करतात,व ते केले पाहिजेत.प्रत्येकाने निदान दोन वर्षातून एकदा तरी,मूळ ठिकाणी जाऊन,कुलदेवतेची ओटी भरून, अभिषेक,नैवेद्य दाखऊन सन्मान
करावा.
पुष्कळांना असा प्रश्न पडतो की,कुलदेवतेची सेवा करायची म्हणजे काय
करायचे,नित्य नेमाने,देवीचे कवच,अर्गला,व किलक वाचावे.संस्कृत सप्तशतीचे पाठ नवरात्रात करावे,संस्कृत सप्तशती करिता
संथा घेणे आवश्यक आहे.किंवा मराठी
,अगर ज्या भाषेत असेल त्या भाषेतले
देवी महात्म्य अष्टमी अथवा मंगळवार पाहून
वाचावे.या मुळे घरात सुख,समृद्धी,शांती
लाभेल.देवीला श्रीसुक्त किंवा देवी अथर्वशीर्षाचा
अभिषेक करावा. पुष्कळ जणांना कुलदेवता
माहीत नसते,आशा वेळी ,जे वयोवृद्ध आपल्या
घराण्यात असतील त्यांना विचारावे.
स्त्रियांनी सुद्धा सप्तशती वाचावी,करण ती
जगन्माता आहे.