Ardhvat - 1 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | अर्धवट - भाग 1

Featured Books
Categories
Share

अर्धवट - भाग 1

ही कथा पूर्णपणे काल्पनिक असायला हवी होती खरंतर. कारण उगाच दोन जीवांची ताटातूट. त्यातून आलेली उदासीनता... आणि शेवटी अधुरं राहिलेलं एक स्वप्नं जे दोघांनी पाहिलेलं... अनेक उतार आणि चढावांनी भरलेलं आयुष्य.. असं सगळं त्यांच्या नशीबी आलं नसतं. कथा तशी साधी आहे. तुमच्या आमच्या सारख्यांच्या आयुष्यात अगदी सहजपणे कुणाच्याही बाबतीत ऐकू येणारी. त्यात माझा सहभाग..? एक मित्र म्हणून होता. यात प्रामाणिकपणे जमेल तितकी मदत करण्याचाच माझा मानस होता..पण..

****

पूर्वा तिच्या आईबाबांसोबत तिचं राहण्याचं ठिकाण बघायला आली. तिला या मोठ्या शहरात तिचं गाव सोडून राहायची पहिलीच वेळ होती. त्यामुळे भाड्याची खोली मिळवण्यासाठी तिचे आईवडील तिच्यासोबत आले होते. एका मोठ्या कपंनीमध्ये तिला ट्रेनी म्हणून जॉईन होण्यासाठी ऑफर मिळाली होती. ती joining फॉर्मॅलिटी करुन तर आली पण तिचं राहण्याचं काही fix नव्हतं झालं. ती आणि आणखी एक अपर्णा नावाची मुलगी, जी खूपच लांबून आलेली. तिचं सुद्धा काही ठरलं नव्हतं. जॉईन झाल्यावर हॉस्टेल किंवा pg शोधता येईल असा तिचाही प्लॅन होता. 

पण जॉइनिंग करताना त्या दोघींमधलं राहण्यासंदर्भातलं संभाषण ऐकून तिथेच असणारे एक सिनिअर ऑफिसर त्यांच्याजवळ आले.

" नमस्कार मुलींनो. मी अनंत बोकील. तुमचं बोलणं ऐकलं. राहण्याची अडचण आहे का? " त्यांनी विचारलं.

" हॊ सर. शोधायचंय अजून. " पूर्वा म्हणाली.

" ऑफिस hours संपल्यावर साडेपाचला ह्या पत्त्यावर या. " त्यांनी कार्ड दिलं त्यावर पत्ता होता. 

पूर्वा आणि अपर्णा त्यांच्या घरच्यासोबत मिळालेल्या पत्त्यावर पोहोचल्या. ते अनंत सरांचच घर होतं. अंनत सर घरीच होते.

"या. माझीच एक रूम आहे वरच्या मजल्यावर. तुम्ही दोघी योग्य वाटलं तर तिथे राहू शकता. आपल्या घराच्या शेजारी एक घरगुती खाणावळ आहे. त्या काकू ओळखीच्या आहेत. त्या एक वेळेच जेवणाचं जमवतील तुमच्या. या रूम दाखवतो." असं म्हणत ते त्यांना वर घेऊन गेले. 

रूम प्रशास्त होती. एक बेड टेबल दोन खुर्च्या एक कपाट भिंतीत तर एक सेपरेट. Attached टॉयलेट बाथरूम आणि पुढे छोटीशी गॅलरी. शिवाय कम्पनी पासून अगदी जवळ. वसची सोयसुद्धा असल्यामुळे नाही म्हणण्याचा विषयच नव्हता. अनंत सरांचं कुटुंब खाली राहत होतं. म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न नव्हता. दोन्ही मुलींच्या घरच्यांनी होकार दिला आणि त्या तिथे राहायला तयार झाल्या.

उद्याचा दिवस सुटीचा असल्यामुळे. दोघीनी रूममध्ये आवराआवर केली सर्व सामान लावून घेतले. चहा नाश्त्यासाठी त्यांना अनंतसरांनी खाली बोलवून घेतले. दोघीना शेजारच्या काकूंकडे घेऊन जाऊन त्यांना खानावळ लावून दिली. दुपारच्या जेवणाला पण दोघीना त्यांनी खालीच बोलवले. त्याना खरंतर संकोच वाटत होता. पण अनंतसर आणि त्यांच्या पत्नी रंजना काकू मायाळू होत्या. त्यांचा आग्रह दोघीना मोडता आला नाही. त्यांचा धाकटा मुलगा निनाद जो आत्ता दहावीला होता त्याच्याशी त्यांची ओळख झाली. 

त्या पानावर बसल्याच होत्या तितक्यात घराच्या अंगणात बाईक चा आवाज आला.
"रितेश आला वाटतं." रंजना काकू बोलल्या. रितेश त्यांचा थोरला मुलगा होता. त्यानेही त्याचं वर्षी ट्रेनी म्हणून तिचं कम्पनी जॉईन केली होती. तसा तो काही फार हुशार वैगरे नव्हता. घरात त्याचं पाऊल ठरत नसे. सतत मित्रांसोबत हिंडणे. उनाडक्या करने. हे सगळं चालू असताना. थोडेफार व्यसनी प्रकार देखील करत होता. त्याच्या वडिलांनी त्याला थोडी शिस्त लागावी म्हणून  बारावी नंतर वशिल्याने तिथे जॉईन करवून घेतला होता. 

आल्या आल्या त्याने पाहिले की dining टेबल वर त्याच्याच वयाच्या दोन मुलीं बसल्या आहेत. एव्हाना त्याला कळले होते की त्या दोघी राहायला आल्या आहेत. पण सकाळी लोळत पडलेला असल्यामुळे त्या त्याला नाश्त्याच्यावेळी भेटल्या नव्हत्या. पूर्वाकडे त्याने पाहिले आणि बघतच राहिला. पूर्वा दिसायला चार चौघीत उजवी होती. सहज कोणीही आकर्षित होऊन बसेल अशी. बाहेर मुलींवर जाळे फेकत प्रयत्न करणाऱ्या रितेशला घरातच टार्गेट मिळालं असं वाटू लागलं. 

पटकन हात धुवून तोही सर्वाना जेवणात सामील झाला.
आपल्या बोलघेवढ्या स्वभावाने दोघीसोबत त्याने चांगलीच गट्टी जमवली. सर आणि काकूंनाही तिघांचे ते मोकळेपणाने बोलणे नैसर्गिक वाटत होते. पण रितेशच्या मनात पूर्वाबद्दल जरा जास्तच रस निर्माण झाला होता. 

" संध्याकाळी माझ्या सोबत चला. निनाद तू पण चल. दोघीना एरिया दाखवून आणू. इथे कुठे काय आहे आणि मिळते ते सगळं माहित होईल तुम्हा दोघीना." असं म्हणून अप्रत्यक्षरित्या पूर्वा सोबत वेळ घावण्याची संधी त्याने मिळवली.

मग चौघे संध्याकाळी एकत्र फिरले. Icecream वैगरे खाल्ली. रितेशने दोघींचा मित्र बनत चांगलाच विश्वास संपादन केला. पूर्वा कडे त्याचं जरा लक्ष असल्यामुळे. तिच्या मनात पण त्याच्याबद्दल जरा सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. तीही विनसंकोच त्याच्यासोबत मोकळेपनी गप्पा मारू लागली. त्याच्या तिथे बऱ्याच ओळखी असल्यामुळे तीन चार मुलांशी पण त्याने ओळख करुन दिली. जेणेकरून कोणी त्या एरियामध्ये नव्या म्हणून त्यांना त्रास देणार नाही. पूर्वा आणि अपर्णा रितेशवर बऱ्याच इम्प्रेस झाल्या होत्या.

तिथून पुढे मग रितेश दोघींचा घट्ट मित्र होत गेला. एकत्र फिरणे, सिनेमाला जाने, शॉपिंग छोट्या मोठ्या ट्रिप्स वैगरे करने नित्याचे झाले. पूर्वा सोबत जास्तीत जास्त वेळ घालण्यासाठी रितेश तिला बाईक वरून कपंनीमध्ये नेऊ सोडू लागला. अपर्णा सोबत त्याने मैत्री चांगली ठेवतं दोघांना अप्रत्यक्षरित्या तिचा सपोर्टच मिळवून घेतला. पूर्वाकडे स्वतःच्या भावना व्यक्त करण्याआधी त्याने अपर्णाला त्या सांगितल्या. जेणेकरून तिला तो खूप जवळचा मित्र वाटू लागला. तिने हळूहळू पूर्वाच्या मनात रितेशबद्दल प्रेमाचे बीज पेरायला सुरुवात केली. 

मग पुढल्या valentine day च्या दिवशी रितेश पूर्वाला घेऊन डेट वर गेला. तिथे त्याने तिला प्रपोज केले. ती नाही म्हणूच शकली नाही. रितेशच्या प्रेमाला होकार मिळाला होता.

****

"निधी!! प्लिज यार माझं ऐकून तर घे." सुमित ब्याकुळ स्वरात म्हणाला.

" तुझं कुटुंब आणि माझं कुटुंब.. दोघांमध्ये खूप फरक आहे विचारसरणीत. माझी मते तुझ्या घरच्यांच्या विचारसरणीत बसत नाहीत. मी फक्त प्रेमासाठी माझं पुढलं आयुष्य नकारात्मक वातावरणात नाही घालवू शकतं... आपण आपले रस्ते वेगळे करूयात. मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस." निधी सुमितला म्हणाली आणि तिथून निघून गेली.

तिच्या स्पष्ट आघाताने सुमित कोसळला होता. त्याचं दोन वर्ष चाललेलं प्रेम प्रकरण त्याचं दिवशी संपुष्टात आलं होतं. गेले काही दिवस त्याचे स्वतःच्या घरच्यांना आणि निधीला लग्नासाठी मनवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. मतभिन्नतेमुळे त्याच्या घरच्यांनी आणि तिने एकमेकांना अमान्य करत सुमीतच्या प्रेमाचा वध करत त्याची प्रेमकहाणी संपुष्टात आणली. आता तो प्रयत्न करुन थकला होता. त्याला सर्वच गोष्टींचा राग आला होता. त्याला नवं काही हवं होतं जे त्याच्या आयुष्याला पूर्ववत करेल.

नेमकं त्याचवेळी त्याला दुसऱ्या शहरातून त्याने दिलेल्या एका कपंनीच्या interview मध्यें सिलेक्ट झाल्याचा कॉल आला. 
नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची संधी अनपेक्षित पणे समोर आली होती. निधी तर गेली होती. आता सुमितला त्याचा मार्ग धरणे गरजेचे होते. त्याने मोबाईल मधला निधीचा नंबर डिलीट केला. तिचे सर्व मेसेजेस एकेक करुन डिलीट केले. आकाश निरभ्र झालं होतं. त्याच्या अवकाशात नव्या विचारांचे पक्षी मुक्त विहार करू लागले तो पुढे सरकायला सज्ज झाला होता. 

...पूर्वा रितेश शी सुमितचा काय संबंध होता?  कोणते असे घटक होते जे त्या तिघांना एका वळणावर आणणार होते? माझ्याखेरीज आणि कोण सांगू शकेल??

-
क्रमशः 

शब्दभ्रमर 🍁🍁