Ardhvat - 2 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | अर्धवट - भाग 2

Featured Books
Categories
Share

अर्धवट - भाग 2

"सर! हे कसं जोडतात? मला माहित नाहीये. तिथे कुणीच नाहीये सांगायला? प्लिज सांगता का?" हातामध्ये ओरिजिनल ड्रॉईंग आणि ब्लु प्रिंट पेपर घेऊन पूर्वा उभी होती.

मी रेकॉर्ड रूममध्ये काही ओरिजिनल ड्रॉईंग्स घ्यायला आलो होतो. मी इकडे तिकडे पाहिले. रेकॉर्ड डिपार्टमेंट पूर्णच रिकामं होतं. सगळे चहा घ्यायला गेले असावेत. 

" चल दाखवतो." असं म्हणून तिला अमोनिया प्रिंटिंग मशीनकडे घेऊन आलो. तिचे दोन्ही पेपर घेतले. तिला कुठल्या बाजूने जुळवतात ते दाखवले. नीटपणे ब्लु प्रिंट घेऊन ती फोल्ड कशी करायची ते ही शिकवले. सेपिया प्रिंटिंग तिला माहित नव्हते ते ही करुन दिले. तिचा संपूर्ण सेट रेडी झाला. ती उजळली.

" सर!! खूप thanks! 3 दिवस झाले येत आहे मी इथे पण कोणी काहीच सांगत नव्हतं. माझे सर मला रोज ओरडतायत की drawings न आणल्यामुळे पुढचं काम रखडलंय. मला आजतर रडायलाच येत होतं. तुम्ही पटकन सांगितलंत, शिकवलत म्हणून हे झालं. " तिचं काम पूर्ण झाल्याचं समाधान चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. ट्रेनीज् ना हलकी कामे लावून bossing करणारे ऑफिसर्स आमच्याकडे खूप होते. त्यात बारीकशी मदत करायला भाव खाणारे लोकं देखील जास्त. माझ्यासाठी ते किरकोळ काम होतं. 

" ठीक आहे. आता तुला नाही गरज लागायची. करशील तुझं तू. होना? मी विचारले.

" हॊ!! करेन.. धन्यवाद सर." ती म्हणाली.

" विराज!! माझं नाव  Vehicle integration ला काम करतो. तू? " तिला विचारलं.

" मी पूर्वा. Auto electrical डिपार्टमेंटला महिन्याभरापूर्वी जॉईन झाले." ती म्हणाली.

" पूर्वा! असं सगळ्यांना सर सर करशील तर कोणीच बाजूला सरणार नाही. थोड बिनधास्तपणे वागत चल." मी आपला आगाऊ सल्ला दिला.

" खरंय. विराज सर... I mean Viraj. " ती हसत म्हणाली.

" good. " एवढं बोलून मी निघालो.

माझी आणि पूर्वाची अशी ओळख झाली. मग कधी कॅन्टीन मध्यें, रेकॉर्ड मध्यें, रोडवर दिसलो एकमेकांना तर हसून अभिवादन करुन आम्ही पुढं जायचो. काही दिवसांनी मला पूर्वाच्या ऑफिशियल मेलं id वरून एक मेल आला. ती पेमेंट संदर्भात विचारत होती की, सॅलरी अकॉउंट रिजेक्ट झालं होतं. काय करावं. तिने कुठल्याश्या co-operative बँकेत अकॉउंट काढून ते फायनान्सला दिले होते. Nationalised बँकेत अकॉउंट काढायचा सल्ला मी तिला दिला. शिवाय कम्पनित नवीन जॉईन होणाऱ्या लोकांचे अकॉउंट काढून देणाऱ्या एका एजन्टचाही नंबर तिला दिला. तो 2005-06 सालचा काळ होता. इतकं काही इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम्सचं पेव सगळीकडे पसरलं नव्हतं. 

पुन्हा तिने आभार प्रदर्शन केलं. तिने माझ्याकडून माझा नंबरही मागून घेतला. काही दिवसांनी तिचा कॉल आला. एका ठिकाणी तिला जायचे होते. तो एरिया माझ्या घराच्या जवळ होता म्हणून ती मला विचारत होती. मी तिला माहिती दिली. तिथून पुढे मग दोनेक दिवसात तिचे मला कॉल्स येऊ लागले. आम्ही बरंच काही शेअर करत असू. माझे future plans.. करिअर ग्रोथ वैगरे. तिलाही उत्तम करिअर करायचं होतं. निरनिराळ्या कोर्सेस बद्दल ती विचारायची. काही दीवसांनी आम्ही खाजगी गोष्टींवर पण गप्पा शेअर केल्या. त्यात तिने रितेशबद्दल सुरुवातीपासून सगळे सांगितले. मी अनंतसरांना चांगला ओळखत होतो. मी तिला सल्ला दिला की जर तुझा बॉयफ्रेंड आहे तर मग त्याला माझ्यासोबत तुझं असं बोलणं पटणार नाही. पण तिचं म्हणणं असं होतं की, भावनात्मक पातळीवर त्याचं माझं इतकं शेअरिंग होत नाहीये. त्याला काही फारसं माहीतही नसतं. फक्त मजा करने, फिरायला जाने, पैसे उडवणे एवढंच करतो तो. 

थोडक्यात तिचं म्हणणं हे होतं की तो फार गंभीर नव्हता. तर पूर्वा तिच्या भविष्याबाबत सजग होती. तिला कधी कधी प्रेमात पडल्याची भीतीही वाटायची. तिने असला निर्णय घ्यायची घाई केली म्हणून तिचं मन तिला खाऊ लागलं होतं. ती ते माझ्याशी दिलखुलास पणे बोलत होती. अर्थात मी तिला मित्र म्हणूनच समजून घेत होतो. आमच्यात कधीही असा नाजूक बंध तयार होणारं नाही. याची काळजी मी घेतली. ती आणि मी काहीवेळा आमच्या शहरातल्या बाजारपेठा ही फिरलो. मला माहित असलेली दोन तीन ठिकाणे मी तिला दाखवली. ती माझ्यासोबत बरीच ऐसपैस आणि मोकळ्या मनाने वागत होती. मला ते जाणवायचं. कदाचित त्यामुळे आमची मैत्रीही निखळ होती. 

एकदा तिने मला सांगितले की रितेश नाराज आहे. कारण आपलं कॉल्स वर बोलणं भेटणं वैगरे समजलंय. मला ही गोष्ट आवडली नाही. मी तिच्यावरच वैतागलो. 
"त्याला समजलंय म्हणजे? तू सांगितलं का नाहीस की मी आणि तू मित्र आहोत. माझ्यासोबत तुझे कॉल्स होतात. आपण इकडे तिकडे फिरायला सुद्धा गेलो आहे. मित्रच आहोत ना मग? हे सगळं तू त्याला न सांगता का करत होतीस? मी तुला आधीच बोललो होतो ना त्याला नाही आवडणार."

तिचं म्हणणं पडलं की, "आधी सांगितलं असतं तरी त्याला ते आवडलं नसतं की मी तुला कॉल करावा किंवा भेटावं वैगरे."

"मग थांबवलं असतं भेटणं,कॉल्स करणं. कारण तो तुझा बॉयफ्रेंड आहे. त्याला नाही आवडतं तर तू का उगाच त्याच्या मनाविरुद्ध वागतेस?" मी विचारले. 

मी तिच्याशी बोलणं सोडलं. तिचे कॉल्स रिसिव्ह करणं बंद केलं. तिने तिच्या बॉयफ्रेंडला न जुमानता माझ्याशी लपून मैत्रीचा व्यावहार ठेवावा हे माझ्या तत्वा बाहेरचे होते. काही दिवसांनी तिचे कॉल्स आणि मेसेजेस येणे बंद झाले.

एक दिवस मी माझा काम करत बसलो होतो. तेवढ्यात तिथे आमचे वेंकी सर कोणाला तरी सोबत घेऊन आले. 
"विराज meet our new team mate." मी वळून त्याला पाहिले. हँडसम चेहऱ्याचा आणि मेंटेन्ड तब्येतीचा हसतमुख असा माझ्याच वयाचा तरुण उभा होता.

" Hi!!  Myself Sumit. " तो म्हणाला.

" Welcome Sumit.. Pleasure to meet you. " मी म्हणालो.

....सुमितचे आगमन तर झाले. पण पूर्वा आणि सुमितची गाठ कशी पडणार. पुढल्या भागात नक्की...

- क्रमशः 

शब्दभ्रमर 🍁🍁