Ardhvat - 3 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | अर्धवट - भाग 3

Featured Books
Categories
Share

अर्धवट - भाग 3

सुमित जॉईन होऊन महिना झाला. माझं आणि त्याचं छान ट्युनिंग जमलं. आम्ही एकत्र काही ट्रेनिंग्ज अटेंड केले. Projects मध्यें पण मी त्याला काहीवेळा मदत करू लागलो. तो हुशार होता. भरभर गोष्टी आत्मसात करत त्याने ऑफिस मध्यें एक चांगल मत बनवलं सर्वांच्या मनात. लवकरच तो आमच्या ग्रुपचा पार्ट झाला. त्याच्या रूमवर जाऊन आम्ही पार्ट्याही झोडल्या. त्याला स्वयंपाकाचा आणि व्यायामाचा चांगलाच नाद होता. सुमित एक गुणी व्यक्तिमत्व होता. बऱ्याच गोष्टींवर आमचे एकमत होतं होते. काहीवेळा तो शून्यात हरवलेला दिसतं असे.

एकदा त्याच्या रूमवर आम्ही काही मित्र जमा झालेलो. मटणाचा बेत गॅस वर शिजत असताना त्याने त्याच्या ताज्या ताज्या ब्रेक अप ची कहाणी मला ऐकवली. मला वाईट वाटले. पण मी त्याला समजावलं की तिने तुझ्या आयुष्यात राहून समाधान मिळवलं नसतं तर मग तिच्या निराश मनाने तुम्हा दोघांच्याही आयुष्यात नकारात्मकतेच विष भिनवलं असत. तो सुखाचा मार्ग निश्चितच नव्हता असं दिसतं. तिने ते ओळखून तुझ्यापासून रस्ता वेगळा केला. तुही सावर. आता प्रेमाच्या भानगडीत पडूच नको. घरच्यांच्या इच्छेने लग्न कर. ते तुझ्या मनाप्रमाणे पाहतील सर्व नीट. त्याला त्याच्या वडिलांच्या अति शिस्तीबद्दल थोडी चीड होती. आणि तेच त्याच्या चिंतेच कारण पण होतं. पण ते सदा गावीच राहायला असणारं होते आणि हा इथे. तेव्हा त्याचा संसार सेपरेटच होणारं होता..एवढा पुढला विचार करुन घाबरून जाऊ नको असं मी त्याला बोललो. त्याला हलकं वाटत होतं. हे कोणाशी तरी शेअर करने त्याची गरज होती.

सुमित त्यानंतर आणखी क्लोज आला. काही बोलायचं असेल तर संकोच ठेवत नव्हता. पूर्वा मध्यें मध्यें दिसायची पण मी एखादं स्माईल देऊन निसटायचो. एकदिवस मी कामात असताना सुमित आला.

"चल चहाला." असं म्हणून मला बळेबळे उठवले.

"एक स्थळ आलंय." तो म्हणाला.

" अरे वाह ! कुठली रे मुलगी? " मी आनंदाने विचारलं.

" पुण्यातच आहे.. आमच्या गावाकडली आहे. इथे जॉब करते. वडील म्हणले भेटून घे. " तो म्हणाला.

" भेटला की नाहीस मग? " त्याने विचारले.

" हॊ.. भेटलो की. तिचे वडील माझे शिक्षक होते हायस्कुल ला असताना. त्यांचा मी आवडता विद्यार्थी. हे सहज जुळून येण्यासारखं आहे. " तो म्हणाला.
पण त्याची चर्या काही तितकी उजळली नव्हती.

" अरे ते सगळं सोड. मुलगी कशी आहे. तुला आवडली का? तुला बघून तर तू पसंत पडलाच असणार.. हे नक्की. कुठे आहे जॉबला?" मी आणखी चौकशी करत म्हणालो.

" आपल्याच कम्पनीत. " तो बोलला.

" आयला सुम्या. भारी झालं की. मग काय मजाच दोघे एकत्र एकाच कपंनीमध्ये. कोणतं डिपार्टमेंट? नाव काय सांग लवकर." मी विचारले.

" पूर्वा. ऑटो इलेक्ट्रिकल. " तो शांतपणे म्हणाला.

" पूर्वा!!.. अरे मी ओळखतो तिला. " मी बोललो. तोवर तिचं रितेश प्रकरण डोक्यात आलंच नव्हतं माझ्या.

" हॊ.. बोलली ती मला. आम्ही दीड तास होतो एकत्र पण त्यातला अर्धा तास ती तुझ्याबद्दल बोलत होती. " तो तिरक्या नजरेने माझ्याकडे बघत बोलला.

आयला!! आता ही काय बोलली असेल नसेल ते दोघांनाच माहित. त्यात तिने त्या रितेशचा उल्लेख केला होता की नाही हे ही कळणार नव्हतं मला. यावर काय प्रतिक्रिया द्यावी समजत नव्हतं मला. मला त्याची काळजी होती. कारण याने काही विचारलं आणि माझ्याकडून काही लपवलं गेलं तर मग माझी अडचण होणारं होती.

" ती बोलली की तुम्ही खूप क्लोज फ्रेंड्स आहात. पण तू काही कारणास्तव नाराज आहेस थोडा डिस्टन्स ठेऊन राहतोस हल्ली." तो म्हणाला.

" सुम्या!! तुम्ही तुमचं डिस्कस करायला भेटला होता ना? मग माझं काय एवढं त्यात? " मी म्हणालो. पण माझा जरा गोंधळच उडाला होता.

" ती सध्या कोणासोबत तरी रिलेशनशिप मध्ये आहे. " तो म्हणाला.

मी परत काय बोलावं काय नाही या संभ्रमात.

"मला वाटलं ती तुझ्याबद्दल बोलत असेल म्हनजे.." तो थांबला.

" नाही रे. चालता बोलता आम्ही चांगले फ्रेंड्स झालो. मी कधी तसं आमच्या नात्याकडे बघितलं नाहीये. का? ती काही म्हणाली का तसं? " मी माझी बाजू स्पष्ट केली.

" अरे!! नाय.. नाय.. ती बोलली मला तसं नाही म्हणाली रे .. उलट तुझ्याकडून खूप मदत झाली तिला.. शिवाय तू किती चांगला आहेस याचंच गुणगान गात होती. मला तसं वाटलं तू असशील. पण ती म्हणाली. तू नाही दुसरा कोणी आहे. रितेश म्हणून. त्याला तुमची मैत्री आवडली नाही. म्हणून तू बाजूला झालास. कडक भाऊ. " तो बोलला.

" बरं ते सगळं ठीके. तिने सांगितलं रितेशच. मग? " मी विचारले.

" ती मला कन्फयुज वाटली. म्हणजे ती म्हणतिये की ती कमिटमेन्ट साठी तयार नाहीये त्याच्यासोबत. " तो म्हणाला.

" अय.. सुम्या.. तुला अरेंज मॅरिजसाठी तुझ्या फादरणे मुलीला भेटायला लावलं. तू काय तिचे प्रॉब्लेम्स छातीला लावून बसतोयस.. तिचं तिला कोडं सुटलं की, करेल ती लग्न. आत्ता कन्फयुज आहे तर मग तू पुढे हॊ.. रेंगाळत बसू नकोस तिथं. बरोबर ना? की तुला वाटतंय तिने सॉल्व केलं ते तर तू आहेस? "
मी विचारलं.

" माहित नाय यार. मुलगी चांगलीये. वाटतंय जुळेल हिच्या सोबत. पण ती रितेश नावाची अडचण... " तो विचारात पडल्यासारखा बोलू लागला.

" तिला दूर करायची असेल तर ती करेल. तुला तिचं रिलेशन मध्यें असूनही अडचण नसणं मला समजतंय की तू एक open mindset चा व्यक्ती आहेस. पण तिने ते clear करुन तुझ्या आयुष्यात यावं. असा माझा तुला आणि तिला सल्ला आहे. बाकी तुम्ही बघा. " माझा चहा संपला होता.

पुढं काही त्या गोष्टीवर आमच्यात संभाषण घडलं नाही. पूर्वाचा कॉल वैगरे आला नाही या गोष्टीवर. मला ते अपेक्षितही नव्हतं. 
पण एक दिवस सुमित सुट्टीवर होता. दुपारी मला त्याचा कॉल आला. 

"गेटवर ये भेटायला." तो म्हणाला.
"याला काय झालं आता. " असं म्हणत मी गेलो.

" काय रे? तू सुट्टीवर आहेस ना इकडे काय करतोय? " मी विचारलं.

" यार.. ही पूर्वा.. अरे गेले पंधरा दिवस जवळजवळ रोज येतीये माझ्याकडे.. माझ्या रूमवर.. आम्ही.. म्हणजे फिजिकलं... " 

" श.. श.. शट अप.. प्रॉब्लेम काय झालाय? तेवढं बोल. " मला तसलं त्याचं बोलणं नाही आवडलं तो कितीही रागात असला तरीही.

" अरे तिला माझ्याशीच लग्न करायचंय क्लिअर आहे तिचं. मला दहा वेळा बोलून झालं तिचं. पण.. पण ती आज पुन्हा एकदा.. गेली त्या रितेशसोबत कुठेतरी. तिकडून फोन करुन मला म्हणतीये की मी रितेशसोबत असणारे. मला जमणार नाही.  मी काय येडा आहे कारे.. दर वेळी असं का होतंय माझ्याबाबतीत. " तो विव्हळत होता.

त्याला मी बोललो होतो. तिच्याकडून तिचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व करायला लाव. पण याने लवकर तिच्यात गुंतून स्वतःला त्रास करुन घेतला होता. पूर्वाशी बोलणे भाग होते. सुमितसाठी तरी नक्कीच.

मी तिला तिथूनच कॉल केला. तिने उचलला नाही. परत केला नाही उचलला. सुमित वैतागला होता.

" मरू देत तिला त्याच्यासोबत. गेली उडत." असं म्हणून त्याने माझा निरोप घेतला.

- क्रमशः 

शब्दभ्रमर 🍁🍁