European Highlights - 8 in Marathi Travel stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | युरोपियन हायलाईट - भाग 8

Featured Books
Categories
Share

युरोपियन हायलाईट - भाग 8



 समालोचन 

आता थोडेसे युरोप विषयी अनुभवातून मिळालेल्या व इतरांना उपयोगी पडतील अशा टिप्स आणि निरीक्षणे ..युरोपात चहा अगदी वर्ज्य आहे .भारतीयांना चहाचं व्यसन इंग्लिश लोकांनी लावले पण इंग्लंड वगळता तर युरोपमधे चहा नाही . युरोप म्हणजे सगळीकडे कॉफीचे राज्य आहे.   बिन दुधाची आणि बिनसाखरेची आपल्याला ती सवय नसल्याने पांचट वाटते अशा वेळी  केपेचीनो कॉफी घेणे हा उत्तम पर्याय ठरतो इथे नाश्ता म्हणजे ब्रेडचे अनेक प्रकार असतात त्यातले बरेचसे आपल्याला फारसे आवडत नाहीत अशा वेळी नाश्त्यामध्ये फळे ,फ्रुट जुस, कॉर्न फ्लेक्स ,योगर्ट घेणे हे चांगले  जेवताना भात सॅलड सूप वर भर द्यायचा  म्हणजे  फिरण्यासाठी भरपूर चालायची ताकद टिकवता येते.इथे कुठेही सामान उचलायला हमाल मिळत नाही आपले बॅगेज आपण उचलायचे असते .त्यामुळे प्रवासात कमीत कमी सामान घेणे हे उचित आहे .आणि चार चाकी सुटकेसेस बॅग्स वापरणे अती आवश्यक विमान प्रवासात हँड लगेजसाठी पण छोटी ट्राली बॅग आवश्यक आहे, निदान दोन चाक असलेली तरी हवीच इथे तुम्हाला भरपूर चालावे लागते रोज जवळ जवळ तीन चार किलोमीटर.रोममधे तर सर्वात जास्त दहा ते अकरा किलोमीटर चालावं लागत कारण रोम हे फिरत बघण्याचे शहर आहे .शिवाय अवाढव्य रोम विमानतळावर तुमच्या विमानाच्या गेट पर्यंत पोचण्यासाठी काही मिनिटांचा रेल्वे प्रवास आहे तरीही भरपूर जिने चढ उतार व पायपीट करावी लागते .प्रवासाला जाण्याआधी नियमित व्यायाम करत राहणं आवश्यक आहे, चालण्याची सवय पाहिजेच तब्येत फिट हवी  या सहलीसाठी आणि भरपूर चालण्यासाठी ब्रँडेड स्पोर्टस् शूज आवश्यक आहेत . ते आधी काही दिवस भारतात वापरून त्याची सवय करून घ्यायला हवी  हँड लगेजमधे दोन टी शर्ट, एक पँट, एक थर्मल इतकं मटेरियल हवयुरोप फिरताना जवळ तिकडचे चलन ठेवावे एक सुरक्षितता म्हणून ते आवश्यक आहे  मात्र तुमचा शेवटचा मुक्काम जिथे असेल तिथे सुट्टे चलन म्हणजे सेंट्स अथवा एक दोन पाच युरोची नाणीकाहीतरी खरेदी करून खर्चून टाकावी कारण भारतात आल्यावर फक्त नोटांचे रुपांतर भारतीय रुपयात होते .मोबाईल, पासपोर्ट,पैसे हे सर्व जवळ सॅकमधेच असायला हवं. विशेषतः गर्दीत ती सॅक पुढे धरायला हवी. हे पथ्य पाळल्यास चोरीची शक्यता कमी होते, कारण इथे चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे .त्यातल्या त्यात पॅरिस मध्ये हे प्रमाण अधिक आहे    युरोपात बाटलीतले मिनरल पाणी हा प्रकार नाही. थेट बेसिनच्या नळाचं पाणी प्यायचं ब्रेकफास्टला पाणी भरून घ्यायचंइथले सगळीकडचे पाणी आपल्याला पचते . युरोप स्वच्छ असल्यानेही  हे पाणी पण सुरक्षित असाव कदाचित           बजेटमधे ठरवल्याप्रमाणे झकास हवी ती खरेदी करता येते . काय घ्यायचं हे पक्के असेल तर गोंधळ उडत नाही कारण परदेशात हातात मोजकी कॅश असते तिथं मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमत रुपयात करत बसले तर काहीही घ्यावंसं वाटणार नाही त्यामुळे एक मनात एक लिमिट ठरवून खरेदी करायची. पाच ते दहा युरोपर्यंत वस्तू असेल आणि ती मनात भरली असेल तर लगेच घेऊन टाकायची इथे येण्यापूर्वी याविषयी आपले थोडे वाचन असेल आणि इतिहास माहित असेल  तर इथे फिरण्यात जास्ती मजा येते . आपल्याला थोडेफार कामचलाऊ इंग्रजी बोलता येतं असेल तर आणखी मजा येते जर तुम्ही टूर सोबत असाल तर या गोष्टीची गरज लागत नाही आमच्या टूर मध्ये आम्ही खूप मजा केली .निसर्गाची आणि स्वतःची वेगवेगळ्या पेहरावात भरपूर फोटोग्राफी केली .युरोप प्रवास ठरल्यावर लगेचच आम्ही वेस्टर्न कपड्यांची खरेदी करून ठेवली होती अगदी जैसा देस तैसा भेस या धर्तीवर आमच्या दोन मैत्रिणींनी तर अगदी DDLJ पिक्चर सारखे ड्रेस आणि वेशभूषा प्रत्येक वेळेस केली होती अशामुळे इतर लोकांना सुद्धा उत्साह वाटतो टूर मधले लोक रोज सकाळी बाहेर पडताना आम्ही आज कोणता ड्रेस घातला आहे हे बघत आणि कॉम्प्लीमेंट सुद्धा देत प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डान्स करायला मिळाला तिथे वेळकाळ न पाहता भरपूर नाचुन घेतले.गाणी ,गप्पा, दंगा केला आम्ही सर्व आणि आमचे टूर प्रवासी अगदी रिफ्रेश झालो . वातावरण थंड व स्वच्छ असल्याने दररोज सकाळी पाच ते रात्री बारा पर्यंत शेड्युल असून देखील अजिबात थकायला झाले नाही .दोन तीन वेळा तर आमचा दिवस पहाटे अडीचला सुरु झाला होता ..पण काहीच त्रास झाला नाही .या टूरला आमच्या सोबत पाच सहा डॉक्टर होते पण एकंदर चाळीस लोकांपैकी एकही माणूस एकदाही आजारी पडला नाही किंबहुना कोणाला एखादी गोळी पण घ्यावी लागली नाही हाच त्या हवामानाचा फायदा !!रस्ते अत्यंत सुंदर गुळगुळीत आणि फिरायला परदेशी बनावटीची मोठी गाडी होती त्यामुळे ताशी शंभर किमी वेगाने जाऊन सुध्ध्दा अजिबात पोटातले पाणी  हलले नाही .खरेतर युरोप पाहणे असे स्वप्न कधी पाहिले नाही.. तरीही हा प्रवास आणि त्याचा अनुभव अक्षरशः एखाद्या सुरेख स्वप्नाप्रमाणे वाटला कित्येक दिवस तो अंमल ओसरला नाही ..असे म्हणतात आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे ..आणि तुम्ही जर प्रवास केला नाही तर तुम्ही त्यातील फक्त एकच पान वाचले आहे .त्यामुळे प्रवास करीत राहिले पाहिजे .आम्हाला प्रवास आवडतो .प्रवासात नेहेमीच आपण ठरवल्या सारखे घडतेच असे नाहीअनपेक्षित सुद्धा घडत असते पण थ्रील असणे आणि वेगळेपणा असणे ही तर प्रवासाची मजा आहे .या थ्रील मध्ये मिळणारे अनुभव जरी अनपेक्षित असले तरी अविस्मरणीय असतात .आयुष्य हाही एक प्रवासच असतो इथेही असेच घडत असते ..आपलं बजेट, आपले अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करायचा समजणे खाणंपिणं आणि तब्येत या सगळ्याचा जर विचार केला तर कदाचित  ट्रॅव्हलर किंवा टुरिस्ट होणे तसे सोपे नाही, सगळ्यांना ते परवडत पण नाही.काहीकाहीना तर ते आवडत पण नाही अगदी असे लोक सुद्धा असतात पण ज्यांना हे सारे परवडते ज्यांना प्रवास आवडतो त्यांनी प्रवास करीत राहिले पाहिजे .प्रवास आयुष्याचा असो वा फिरण्याचा तो सुखरूप घडणे हाही थोडा नशिबाचा भाग आहे .प्रवास म्हणजे आश्चर्ये, कधी कधी आश्चर्याचे धक्के सुद्धा ...हे धक्के सुखद असतात तोवरच बरे वाटतात. पण टुरीस्ट असो की ट्रॅव्हलर , कुठल्याही प्रवासाचा आनंद मात्र पुरेपूर लुटायला हवा  अगदी आनंदी मनाने आणि उत्साहाने जर कोणताही प्रवास केला तर तो सुखकर वाटतो हे मात्र नक्की .!!