European Highlights - 2 in Marathi Travel stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | युरोपियन हायलाईट - भाग 2

Featured Books
Categories
Share

युरोपियन हायलाईट - भाग 2

पॅरिस

पॅरिस हिंदी आणि इंग्रजी सिनेमातून अनेकदा पाहिलं होतं आणि अर्थातच आवडलं होतं. एमिली मिडनाईट इन पॅरीस ,आणि  काही आंतरराष्ट्रीय सिनेमातून पॅरिसचे दर्शन होते चित्रकार , चित्रे याविषयी वाचता लिहिताना पॅरीसचा उल्लेख सतत येतंच असतो शम्मीचा एन इव्हिनिंग इन पॅरिस तर हा तर अनेक  वेळा पाहिलेला आणि मनावर मोहिनी पडलेला चित्रपट .त्यामुळे उत्सुकता होतीच .. लंडनच्या सेंट पँक्रा स्टेशनवर सोपस्कार पार पाडून युरोस्टारची वाट बघत बसलो. इथलं वायफाय खुप छान आहे त्यामुळे वाट पाहताना बरेच लोक  मोबाईल मध्येच गर्क होते.आमच्या बरोबरच्या दोन मैत्रीणी नुकत्याच घेतलेल्या मोबाईल सेटिंग मध्ये गुंतलेल्या होत्या हे स्टेशन तर सुंदर आहेच पण बसण्याची व्यवस्था बऱ्याच खुर्च्या असुन सुद्धा सततच्या गर्दीमुळे अत्यंत अपुरी वाटते  .स्टेशनच्या आतमध्ये असंख्य कपड्यांची दुकाने तसेच ब्रांडेड कपड्याच्या शोरूम्स आहेत .पॅरिसच्या फॅशनची सुरवात या रेल्वे स्टेशन पासून होते .युरोस्टार  रेल्वेने आमचा लंडन ते पॅरिस प्रवास सुरु झाला .युरोस्टार ही ताशी तीनशे किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे आहे .अत्यंत सुंदर बैठक व्यवस्था व पुर्णपणे एसी असणारी ही आरामदायक रेल्वे तुम्हाला सव्वा दोन तासांत थेट पॅरिसला घेऊन जाते .ह्या रेल्वेचा अंतर्गत काढलेला फोटो मी माझ्या मैत्रिणीला पाठवला तेव्हा फोटो पाहुन माझी मैत्रीण म्हणाली अग ही रेल्वे आहे का विमान का व्हील्स वरचे हॉटेल..रेल्वेतून जाताना युरोपचा नयनरम्य हिरवागार परिसर नजरेस पडत होता .छोटी छोटी गावे नजरेआड होत होती .पॅरिस येताच रेल्वेतून बाहेर पडून स्टेशन वर उतरलो पॅरिसच्या रेल्वे स्टेशन बाहेरचा परिसर मात्र अत्यंत बकाल होता .आमची बस बाहेर पडताच अडकली ती तुडुंब ट्रॅफिकमधे. ड्रायहरने मोठ्या शिताफीने  बस ट्रॅफिकच्या या जंजाळातून  बाहेर काढली. बसमधून बघताना अख्खे पॅरिस ट्रॅफिक जॅमने वेढलेल दिसत होतदुसऱ्या दिवशी सिटी टूरसाठी बाहेर पडल्यावर सकाळी निवांत पहुडलेले  पॅरिस बघायला मिळाले काही म्हातारे बायका पुरुष नाश्त्यासाठी   Baguette- नावाचा लांबलचक पाव घेऊन जाताना दिसत होते खाण्यापिण्याचे पदार्थ मिळणारी दुकाने,कॅफे आणि रेस्टॉरंट सुरू होते पण बहुतेक दुकाने मात्र बंद होती.त्यावेळी तेथे चालू असलेल्या"यलो प्रोटेस्ट" यामुळे शहरात बराच तणाव पसरलेला दिसत होता. नंतर दिवस वर येऊ लागला तशी पोलिसांची फौजच दिसू लागली. Champs-Elyses हा रस्ता अर्धा बंद झाला, बरेच रस्ते मधेच बंद झाले , ऑपेराहाऊस, प्रेस द ला काँकर्ड , सैनिकांची ज्योत फडकत राहते त्या स्मारकArc de Triomphe' या सगळ्याला पोलिस कार्सने वेढा घातला होता. या सगळ्या प्रकारात बस  थांबवता आली नाही त्यामुळे बरेचसे पॅरिस दर्शन बस मधुन करावे लागले .पॅरिस हे फॅशनचे केंद्र असल्याने  सिटी टूर करताना असंख्य कपड्याची ,कॉस्मेटिकची ,पर्सेसची इतर वस्त्र प्रावर्णाची सुबक मांडणी केलेली दुकाने दिसत होती .तुमच्या पसंती प्रमाणे कपडे शिवून देणारी डिझायनर दुकाने पण अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडत होती .इथली जीवनशैली निवांत असल्याने रस्त्यात निरनिराळ्या हॉटेल्स मधुन अनेक तोकड्या कपड्यातले स्त्री पुरुष निवांत वाईनचा आस्वाद घेताना दिसत होती .इथे पण रस्त्यावरील घराघरातून लटकलेल्या रंगीत फुलांच्या कुंड्या दिसत होत्या . रस्त्यावर अनेक जण  सायकल वरून हिंडत होते .सुदैवाने आयफेल टॉवरवर जाणारे रस्ते खुले झाल्याने आम्ही तिकडे निघालो इतर सर्व ठिकाणे बंद असल्याने आयफेल टॉवर बघायला प्रचंड गर्दी होती. टॉवर बघायला आधी दोन सिक्यूरिटी चेकअप आणि मग अत्यंत मंद गतीने सरकणारी लाईन होती. आयफेल टॉवर खूप जवळून पाहिला तर तसा अनाकर्षक वाटतो या टॉवरचे सामान्यपणे तीन मजल्याचे भाग केले आहेत .पहिला दुसरा व तिसरा असे तिन्ही मजल्यासाठी वेगवेगळ्या मोठमोठ्या लिफ्ट आहेत .एका वेळेस वजनानुसार त्या चाळीस ते सत्तर लोकांना सामावून घेऊ शकतात .याच्या दोन पायातून वर जाण्यासाठी लिफ्ट आहे व दोन पायातून खाली जाण्यासाठी .पहिल्या मजल्यावर गेल्यावर तुम्ही इच्छा असल्यास आरामात जिन्यावरून चालत येऊ शकता .दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरून मात्र फक्त लिफ्टने खाली उतरू शकता .तिसऱ्या मजल्यावर जाणे हे मात्र हवामानावर अवलंबुन असते .आम्ही गेलो तेव्हा हवा बरी होती थोडा भुरभूर पाउस मात्र होता  रेनकोट मात्र घालावे लागले आम्हाला वरपर्यंत जाता आले .वरून वेगवेगळ्या कोनातून पॅरिसचे विहंगम दर्शन होत होते .खुप लांबवर पाहण्यासाठी तिथे दुर्बिणींची पण सोय आहे .आयफेल टॉवरच रात्री अकरा वाजता इल्यूमिनेशन असतं- चमकत्या टॉवरवर अजूनच चमचमणारं नाचरं लायटिंग करतात .ते पाहण्यासाठी रात्री  पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणाहून  येत असतात व त्याचा आनंद घेत असतात .रात्रीचे पॅरिस पाहणे हे कित्येक लोकांचे स्वप्न असतेरात्रीचे पॅरिस आम्ही एन इव्हिनिंग इन पॅरिस मध्ये बघितले होते ते प्रत्यक्ष अनुभवले व पॅरिसच्या गल्ल्यातून एक वाजेपर्यंत मनमुराद भटकलो .अतिशय रोमांचक आणि अविस्मरणीय अनुभव होता तो..आता यानंतर आम्हाला चॉकलेट नगरीकडे म्हणजे बेल्जियम कडे निघायचे होते --------------------------------------------------------------------------------------------------------------------------